कामात दप्तरदिरंगाई व हलगर्जीपणाचा ठपका
विजय उंडे । श्रीगोंदा- 07-Aug, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्यांच्या अनुदान वाटपात झालेली हलगर्जी व दफ्तर दिरंगाईचा ठपका (Criticism of negligence and office delay) ठेवत साडे आठ महिन्यांपूर्वीच रुजू झालेले तहसीलदार प्रदीप पवार (Tehsildar Pradeep Pawar) यांची तडकाफडकी बदली (Tadkaphadki changed) करण्यात आली आहे.
बदलीचा शासकीय आदेश शुक्रवारी रात्री उशिरा आला. यानुसार त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील केवडिया कॉलनी येथे पुनर्वसन अधिकारी या रिक्त पदावर पाठविण्यात आले आहे.
गेल्यावर्षी तहसीलदार महेंद्र माळी यांची बदली झाल्यानंतर श्रीगोंद्याच्या तहसीलदारपदी शेजारच्या शिरूर तालुक्यातील रहिवासी असणारे प्रदीप पवार यांची अधिकार्यांच्या दृष्टीने आवडत्या श्रीगोंद्याच्या तहसीलदारपदी नियुक्ती झाली. तरुण व तहसीलदार पदावर त्यांची पहिलीच नियुक्ती असल्याने श्रीगोंदा तालुक्याने त्यांचे जोरदार स्वागत केले.
श्रीगोंद्यात कार्यरत असतानाच त्यांचा विवाहही पार पडला. त्यांच्या बदली आदेशात म्हटले आहे की, पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पात्र शेतकर्यांना वेळेत मदत देण्याची गरज असताना दप्तर दिरंगाई व हलगर्जीपणामुळे सुमारे 2 कोटी 12 लाख रुपये शासनाला परत पाठवण्याची नामुष्की ओढवली होती. या बाधित खातेदारांना होणारी मदत विविध कारणांमुळे वंचित ठेवण्यात आली होती.
तर नदीकाठच्या चार गावांतील 36 शेतकर्यांना पात्र मर्यादेपेक्षा अतिरिक्त क्षेत्रासाठी मदतीचे वाटप केले होते. पवार यांनी शासकीय कर्तव्ये जबाबदारीने व तत्परतेने पार न पडल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र शासकीय कर्मचार्यांचे बदल्यांची विधिनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडत असताना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अन्वये 4(5) नुसार त्यांची बदली करण्यात आली आहे.
तालुक्यातील सत्ताधारी व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सल्ल्यानुसार काम करण्याचे दडपण झुगारून दिल्यामुळे अनेक नेते असंतुष्ट होते. या नेत्यांनी पवार यांच्या विविध तक्रारी मुंबई पर्यंत पोहोचविण्याचे काम केले होते.
याशिवाय कोविडच्या दुसर्या लाटेत झालेले विविध आरोप, तालुक्यातील अवैध वाळूउपसा, बेसुमार गौणखनिज चोरी याला संपूर्ण आळा घालण्यात आलेते अपयश. तालुक्यातील बेरकी राजकारणाचा जबाबदारी स्विकारल्यानंतर अननुभव बसलीस कारणीभूत आहे. याशिवाय त्यांचे सर्वोत्तम काम म्हणजे शेतकर्यांचे शेत रस्ते, शिव रस्ते अशी शेकडो प्रकरणे त्यांनी सामंजस्याने निकाली काढली.
प्रदीप पवार यांच्या बदलीनंतर गौणखनिज, पुरवठा विभाग, जमीन, महसूल विभागातील मोठ्या अधिकार्यांच्याही बदल्या होण्याची शक्यता आहे.
Comments