शाखा व्यवस्थापक गंभिर जखमी
अहमदनगर । वीरभूमी- 07-Aug, 2021, 12:00 AM
पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या (Parner Gramin Patsanstha) बेलवंडी फाटा शाखेवर भरदिवसा गोळीबार करत दरोडा (Robbery by firing all day) टाकल्याची घटना आज दुपारी 2.35 वाजेच्या दरम्यान घडली.
या घटनेत शाखा व्यवस्थापक यांच्या छातीला गोळी चाटून गेल्याने ते गंभिर जखमी झाले आहेत. (The branch manager was shot in the chest and suffered serious injuries.) जखमी शाखा व्यवस्थापकांचे नाव बाळासाहेब सोनवणे असे असून या घटनेने परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर ग्रामीण पतसंस्थेची अहमदनगर - पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे शाखा आहे. या शाखेवर काही अज्ञात दरोडेखोरांनी आज दुपारी पाळत ठेवून दरोडा टाकला. पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे हे दुपारी 1.35 वाजेच्या दरम्यान शाखेच्या बाहेर गले होते.
दरम्यान पाळत ठेवून असलेल्या दरोडेखोरांनी पतसंस्थेत प्रवेश करत हातातील रिव्हॉल्वरचा धाक दाखवून कॅशिअर महिलेकडून पाच लाख रुपयाची रोकड घेतली. त्याचवेळी बाहेर गेलेले शाखा व्यवस्थापक आत आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेचच तेथे एका कोपर्यात पडलेला झाडू घेऊन दरोडेखोराला मारण्यास सुरूवात केली.
झाडूने मारहाण करत असतांनाच दरोडेखोराने हातातील रिव्हाल्वरमधून शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी सोनवणे यांच्या छातीला चाटून गेल्याने ते गंभिर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सुरुवातीला शिरुर येथे व नंतर पुणे येथे हलविण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती कळताच पतसंस्थेचे अध्यक्ष काशिनाथ दाते व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल होत आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तयार करून रवाना करण्यात आले.
या घटनेने नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून भरदिवसा पडलेल्या दोरोड्यामुळे भितीचे वातावरण तयार झाले आहे.
zvZrlMcNTJG