पुण्यातील 4 कोटीची मालमत्ता केली जप्त
पुणे । वीरभूमी- 09-Aug, 2021, 12:00 AM
रोजगाराच्या शोधात पुणे येथे जावून बांधकाम व्यावसायात नाव कमावलेल्या अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात (Money laundering case) चांगलाच दणका दिला आहे. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 4 कोटीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मागील काही महिण्यापासून अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले हे ईडीच्या रडारवर होते. (Bhosale was on the radar of the ED.)
अविनाश भोसले हे अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (sangamner) येथून रोजगारासाठी पुण्यात गेले होते. त्यांनी तेथे प्रारंभी रिक्षा चालक म्हणुन काम केले. नंतर त्यांनी रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय केला.
याच दरम्यान अविनाश भोसले यांची बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी ओळख झाली. यातून त्यांनी रस्ते बांधकाम काँन्ट्रक्टर घेण्यास सुरुवात करत पैसा व नाव कमावले.
गेल्या काही महिण्यापासून बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा हे ईडीच्या रडारवर होते. तसेच मागील महिण्यात त्यांची व त्यांच्या मुलाची सलग पाच तास चौकशी केली होती. पुणे येथील सरकारी जमिनीवर भोसले यांनी बांधकाम केले होते. या बांधकाम प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे.
गुन्हा रद्द करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडी विरोधात याचिका दाखल केली होती. ईडीने चौकशीसाठी बोलावूनही भोसले हजर न राहील्याने ईडीने मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे.
आतापर्यंत ईडीने फेमा कायद्याअंतर्गत अविनाश भोसले यांची नागपूर आणि पुणे येथील 40 कोटी 34 लाख रुपये किंमतीची मालमत्ता जप्त केलेली आहे. तसेच विदेशी चलन प्रकरणी दोन वेळा चैकशीही केली आहे. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबाचीही चौकशी झाली होती.
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले हे मुळचे संगमनेर येथील असून ते सध्या पुणे येथे स्थायिक आहेत. तसेच ते राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.
cEKjvZrFpmiLDbyQ