अहमदनगर । वीरभूमी- 09-Aug, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकड्यामध्ये घट (Decrease in the number of corona lesions) झाल्याने नगरकरांना दिलासा मिळत आहे. आज सोमवारी जिल्ह्यात एकुण 638 कोरोना बाधित आढळले. दोन दिवसापासून जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत घट होत आहे.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या पारनेर तालुक्याची (Parner taluka has the highest number of patients) असून दुसर्या स्थानावर संगमनेर तर तिसर्या स्थानावर श्रीगोंदा तालुक्याचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे आज सर्वच तालुक्याची आकडेवारी शंभरच्या आत आहे.
रविवारी जिल्ह्यात 927 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 93 हजार 851 एवढी झाली आहे. तर शनिवारी उपचार घेणार्या रुग्णांची संख्या 5 हजार 681 एवढी होती. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची पोर्टलवरील नोंद 6 हजार 302 एवढी होती.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 150, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 225 तर अँटीजेन चाचणीत 263 असे 638 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 97, संगमनेर 77, श्रीगोंदा 73, नगर ग्रामीण 55, नेवासा 44, कर्जत 41, शेवगाव 40, अकोले 38, पाथर्डी 36, श्रीरामपूर 33, नगर शहर 27, राहुरी 22, जामखेड 19, इतर जिल्हा 15, राहाता 12, कोपरगाव 09 असे कोरोना बाधित आढळून आले.
VZaEfSOXeuKTki