पाथर्डी । वीरभूमी- 09-Aug, 2021, 12:00 AM
आमदार मोनिकाताई राजळे यांच्या आवाहनाला शेवगाव-पाथर्डी तालुका भाजपा व भाजपाच्या ताब्यातील संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्तांसाठी मदत जमा करून ती पाठविली. कोकणातील पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी पाथर्डी व शेवगाव तालुका भारतीय जनता पार्टी (Pathardi and Shevgaon Taluka Bharatiya Janata Party) तसेच
आदिनाथनगर येथील आदी फाउंडेशन (Adi Foundation), पाथर्डी पंचायत समितीचे पदाधिकारी, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी, वृद्धेश्वर दूध संघाचे पदाधिकारी तसेच तिसगाव येथील सुनील परदेशी, सुनील पुंड, सुनील शिंगवी व महिला बचतगटाच्यावतीने मदत जमा करून पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आली (Help was collected and sent to the flood victims).
तसेच शेवगाव येथील सागर फडके, बेलगावचे सरपंच विठ्ठल गायके, नितीन देवढे, अर्जुन इंगळे इत्यादींकडून किराणा, कपडे, बिस्कीट, पाण्याचे बॉक्स व इतर अत्यावश्यक साहित्य पूरग्रस्तांसाठी देण्यात आले. साहित्याने भरलेली दोन वाहने आमदार मोनिका राजळे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण कडे रवाना झाले.
गेल्या आठवडयात आमदार मोनिका राजळे यांनी कोकणातील पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वस्तू स्वरूपात मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही तालुक्यातील पदाधिकार्यांनी किराणा, चटया, कपडे, पाण्याचे बॉक्स, आरोग्य साहित्य व इतर मोठ्या प्रमाणात मदत जमा केली.
आमदार राजळे यांच्या आदी फाउंडेशननेही मोठी मदत देऊन, सर्व मदत एकत्र करून आज शहरातील स्व. वसंतराव नाईक चौकात समारंभपुर्वक कार्यक्रमात साहित्याने भरलेली दोन वाहने कोकणातील पुरग्रस्त भागातील चिपळुणकडे रवाना करण्यात आली.
या वाहनातील साहित्य तेथील प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येणार असुन प्रशासनातर्फे त्याचे वाटप केले जाणार आहे. यावेळी भाजपाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शेवगावचे तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे, बापुसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, सभापती गोकुळ दौंड, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकाण, एकनाथ आटकर, नगरसेविका मंगल कोकाटे, रमेश गोरे, भाजपाचे शहराध्यक्ष अजय भंडारी, वृध्देश्वरचे संचालक बाळासाहेब गोल्हार, अभिजीत गुजर, रणजीत बेळगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक उपस्थित होते.
भाजपा व संस्थाकडून पाठविण्यात आलेली मदत पूरग्रस्तांसाठी महत्वाची ठरणार आहे. भाजपाने राबविलेला उपक्रमाचे नागरिकांमधून कौतूक होत आहे.
CXYVWhEnvtkPDxia