शेवगाव । वीरभूमी- 09-Aug, 2021, 12:00 AM
कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणुन वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्यावतीने (World Maratha Organization) राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यात 72 ठिकाणी रक्तदान शिबिराचे (Blood donation camp) आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये शेवगाव येथे आयोजित केलेल्या शिबिरात रक्तदात्यांचे रेकॉर्ड (Blood donor records) झाले. या शिबिरात तब्बल 118 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे (Social commitment is maintained by donating blood.).
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने सरकारचे नियम पाळत शेवगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन स्वराज मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक बबनराव म्हस्के यांचे हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या प्रभावामुळे व सध्या मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या कोविड लसीकरणामुळे रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात 72 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई व महाराष्ट्र राज्य शासन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हे भव्य रक्तदान शिबिर पार पडले.
या रक्तदान शिबिराचे मुख्य ध्येय म्हणजे थॅलॅसिमिया, हिमोफेलिया आणि इतर सर्व गरजू रुग्ण यांना मदत होईल, असे होते. हे रक्तदान शिबिर वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मराठा प्रवीण आणि कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
शेवगाव येथील स्वराज मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात युवकांनी उत्सपुर्तपणे सहभाग घेतला. या शिबिरात तब्बल 118 दात्यांनी रक्तदान केले. यामध्ये विशेष बाब म्हणजे ठाकूर निमगाव येथील 25 युवकांनी एकजुटीने रक्तदान करून, रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी अष्टविनायक ब्लड बँकेचे संदीप पाटोळे, डॉ. ढवन, राहुल देवकर, नलिनी मुसळे, पूजा प्रधान, संजय मुळे, सुनिता यारला व स्वयंसेवक अभिजीत शेळके, प्रवीण थोरात, निखिल पवार, लक्ष्मण मडके, कानिफनाथ मुरदारे, संदीप मुरदारे, सागर बारगळे, दीपक चाहुर, राज फाटके, ज्ञानेश्वर झाडे, आकाश मुरदारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
vbdCfKGcZVBD