हत्या की, आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा
शेवगाव । वीरभूमी- 10-Aug, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील नदीच्या पात्रामध्ये आठ वर्षाच्या मुलासह महिलेचा मृतदेह आढळल्याने (The body of a woman with an eight-year-old child was found) एकच खळबळ उडाली आहे. हे दोन्ही मृतदेह नदीवरील पुलाला अडकल्याचे आढळून आले. ही हत्या आहे की, आत्महत्या (That is murder, suicide) याबाबत परिसरात उलटसुलच चर्चा होत आहे.
मयत महिलेचे नाव ज्योती आंबादास सोनवणे (वय 29) तर मयत मुलाचे नाव दीपक आंबादास सोनवणे (वय 8) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद (Accidental death recorded at Shevgaon police station) करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आंबादास सोनवणे हे पत्नी ज्योती, मुलगा दीपक व एका महिलेसह रविवार दि. 8 रोजी घरातून बाहेरगावी गेले होते. मात्र घरी येतांना आंबादास सोनवणे हे एकटेच आले. यावर त्यांची मुलगी प्रियंका सोनवणे हीने आई व भाऊ कुठे असे वडीलांना विचारले असता, ते घरी आले नाही का? असा प्रतिप्रश्न करत आपण त्यांचा शोध घेऊ असे आंबादास याने मुलीला सांगितले.
यावर या दोघांनी शोध घेऊन बोधेगाव पोलिस चौकीत पत्नी व मुलगा हरवल्याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर आंबादास सोनवणे हा पत्नी व मुलाचा शोध घेतो म्हणुन घरातून बाहेर गेला तो परत आलाच नसल्याने त्याच्या मुलीने सांगितले.
दरम्यान शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव परिसरात रविवारी पाऊस झाल्याने नदीला पाणी आले होते. या नदीच्या पाण्यामध्ये एक महिला व आठ वर्षीय मुलाचे मृतदेह वाहुन येत शेवगाव-गेवराई राज्य मार्गावरील पुलाला अडकल्याचे काहींच्या निदर्शनास आले. नागरिकांनी ते मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. हे दोन्ही मृतदेह ज्योती सोनवणे व दीपक सोनवणे यांचे असल्याचे ओळखले.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी चौकशी केली असता आई व भाऊ वडिलांबरोबर गेले होते, अशी माहिती मुलगी प्रियंका सोनवणे हिने पोलिसांना दिली.
सोनवणे हे कुटुंब शेती व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. आंबादास सोनवणे व ज्योती सोनवणे यांचे एका महिलेवरून सतत वाद होत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. यामुळे मयत माय लेकाने आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली.
याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा होत असून पोलिस आंबादास सोनवणे याचा शोध घेत आहेत. आंबादास सोनवणे याच्या शोधानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
Comments