पाथर्डी । वीरभूमी- 10-Aug, 2021, 12:00 AM
एक कोविड सेंटर सुरू केले (Covid Center started) म्हणजे खूप मोठे काम केले असे त्यांना वाटते. मतदार संघात झालेला विकास दिसत नसेल (The development in the constituency may not be visible) तर माझ्या बरोबर या, मी तुम्हाला मतदारसंघात फिरून विकास कामे दाखविते. ते सुद्धा जमत नसेल तर तुमच्या कारखान्या शेजारचा आम्ही केलेला रस्ता तरी पहा. अशा शब्दात आमदार मोनिका राजळे यांनी अॅड. प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता फटकारले. (MLA Monica Rajale, Adv. Pratap Dhakne was hit without mentioning his name.)
तालुक्यातील दुर्गम भागातील माणिकदौंडी ते सोनाळवाडी (Manikdaundi to Sonalwadi) व आल्हनवाडी ते काकडदरा या सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बाबाजी बोरसे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, सोमनाथ खेडकर, शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चितळे, पंचायत समितीचे गटनेते सुनील ओव्हळ, सुभाष केकान, सरपंच संजना बोरसे, सरपंच मनीषा कर्डिले, गंगाधर सुपेकर आदींसह ग्रामस्थ कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
मागील आठवड्यात अॅड. प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार मोनिका राजळे यांचेवर तीव्र टीका केली. त्यावेळी त्या दिल्लीला होत्या. तीव्र शब्दातील टीका गांभीर्याने घेऊन अधिक आक्रमक होत आ. राजळे यांनी प्रत्युत्तराची तयारी करून तोफ डागली. यामुळे निवडणूक पूर्व राजकीय हवा तालुक्यात तापल्याने कार्यकर्ते सावध झाले आहेत.
यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या, गेली साडेचार वर्ष कुंभकर्णा प्रमाणे झोपेत असलेले विरोधक निवडणुका आल्यावर नेहमीप्रमाणे जागे होतात. विकास कामांमध्ये मताचे राजकारण कधीच केले नाही. तीन-चारशे लोकसंख्या असलेल्या अशा गावांमध्ये कोट्यावधींचे कामे करताना राजकीय भेदभाव केला नाही. वर्षानुवर्षे उपेक्षित भाग विरोधकांना दिसला नाही. गेली पाच वर्ष केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार होते. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना मुख्यमंत्री ग्रामसडक व जलयुक्त शिवार सारखा योजना सुरू झाल्या. त्या माध्यमातून तालुक्यात विकास झाला. पाणी पातळी वाढली.
सध्या पाऊस लांबला तरी टँकर सुरू करण्याची वेळ अजून आली नाही. गेल्या सहा-सात वर्षांपासून इतरांवर टीका टाळून विकासकामांना महत्त्व दिले. बोलणारे कोण व काम करणारे कोण याची लोकांना जाणीव आहे. आम्ही मालाच्या ट्रक विकल्या नाही. हाणामार्या केल्या नाहीत. विरोधकांना निवडणुकांची घाई झाली आहे.
एक कोविड सेंटर सुरू करून त्याचा किती गाजावाजा केला. आम्ही व पदाधिकार्यांनी अनेक सेंटर सुरू केले पण गाजावाजा केला नाही. आजची कामे यापूर्वीच्या सरकारच्या काळातील आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाची भीती दाखवून अनेक योजना बंद केल्या. लसीकरणासाठी केंद्राकडून मोफत लस मिळूनही राज्य सरकारकडून टीका केली जाते. लोकांना टीकाटिपणी पेक्षा विकासकामाची गरज आहे. असे राजळे म्हणाल्या.
Comments