जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे आदेश
अहमदनगर । वीरभूमी- 14-Aug, 2021, 12:00 AM
तब्बल दीड वर्षानंतर प्रथमच ग्रामस्तरावर होणार्या ग्रामसभांना परवानगी मिळाली आहे. मात्र ग्रामसभा कोविडचे नियम पाळूनच घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिल्या आहेत. याबाबत शुक्रवारी आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशामुळे दि. 15 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार्या ग्रामसभांना केवळ 200 जणांची उपस्थित राहील, असा नियम आदेशात आहे. यामुळे ग्रामविकासाला चालना मिळणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे ग्रामविकासासाठी महत्वाची असलेल्या ग्रामसभा बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी ग्रामविकासाला खीळ बसली आहे. ग्रामविकासासाठी ग्रामसभांना परवानगी द्यावी अशी मागणी प्रत्येक गावातील विरोधकांची मागणी होती. मात्र कोरोना संसर्गामुळे परवानगी देण्यात आली नव्हती.
मात्र शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने एक आदेश काढून दि. 15 ऑगस्ट पासून ग्रामसभांना परवानगी दिली आहे. मात्र ग्रामसभा घेतांना कोविड नियमाचे पालन करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून थांबविण्यात आलेल्या ग्रामीण स्तरावरील ग्रामसभा दि. 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी याबाबत आदेश जारी केला.
दि. 15 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी ग्रामसभा सोशल डिस्टंसिंग, ग्रामसभेला येणार्यांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. ग्रामसभेसाठी 200 जणांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.
Comments