तालुक्यातील सर्वोत्कृष्ट कामाचा जिल्ह्यात गौरव.
वीरभुमी- उद्धव देशमुख. 15-Aug, 2021, 12:00 AM
पंचायत समिती शेवगाव येथील सभापती पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर तळागाळातील सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानुन डॉ क्षितिज भैय्या घुले यांनी तालुक्यात विकासाची मुहूर्तमेढ रोवली त्याच अनुसंगाने त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल योजना, गावांतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी आदींची सोय व्हावी यासाठी सदरील योजनेला प्रोत्साहन दिले.
तसेच अतीवृष्टीने बळिराजाच्या झालेल्या नुकसानीला सरकारची मदत मिळावी म्हणून केलेले यशस्वी प्रयत्न, पाणी आडवा पाणी जिरवाच्या माध्यमातून नदीवर दिलेल्या बंधाऱ्या मुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे. जि प शाळेच्या विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्यां विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा पंचायत समितीत गौरव, कोरोना काळात वाखाणण्याजोगे समाज हिताचे सामाजिक बांधिलकी जपत केलेले काम तसेच तालुक्यातील दिव्यांगाचे प्राधान्याने सोडवलेले प्रश्न.
या सर्वांचा विचार करत आज दि.१५ ऑगस्ट २०२१ या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शुभ मुहूर्तावर अहमदनगर येथे प्रशासकीय कार्यक्रमात महाआवास अभियान राज्यपुरस्कृत रमाई आवास योजनेतुन जिल्ह्यात "सर्वोत्क्रुष्ट तालुका (प.स.)प्रथम पुरस्काराचा" सन्मान शेवगांव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज भैय्या नरेंद्र घुले याना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देउन करण्यात आला.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना. सौ.राजश्रीताई घुले पाटील, शेवगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके उपस्थित होते.
BivZMhegPUuI