अहमदनगर । वीरभूमी- 19-Aug, 2021, 12:00 AM
नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा बुधवार पासून वाढू लागला आहे. बुधवारी कोरोना (corona) बाधितांचा आकडा वाढल्यानंतर आज गुरुवारीही बाधितांचा आकडा वाढला आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात (ahmednagar) एकुण 833 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. (ahmednagar corona update)
आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर (sangamner) टॉपवर असून दोनशेचा आकडा पार केला आहे. तर आज श्रीगोंदा (shreegonda) तालुक्यानेही शंभरी पार करत दुसरा क्रमांक पटकावला आहे तर पारनेर (parnear) तिसर्या स्थानावर आला आहे.
सध्या निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडतांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 156, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 383 तर अँटीजेन चाचणीत 294 असे 833 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 227, श्रीगोंदा 113, पारनेर 94, अकोले 50, राहाता 49, नगर ग्रामीण 45, शेवगाव 40, राहुरी 33, कर्जत 29, पाथर्डी 29, नेवासा 28, इतर जिल्हा 24, कोपरगाव 22, श्रीरामपूर 21, नगर शहर 15, जामखेड 11, भिंगार 02, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
bORChtFTQEIw