शेवगाव । वीरभूमी - 25-Aug, 2021, 12:00 AM
सुगंधी तंबाखू व मावा विक्री (Selling fragrant tobacco and powder) प्रकरणी शेवगाव (shevgaon) तालुक्यातील बोधेगाव (bodhegaon) येथील चार पान टपर्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकाने छापा टाकून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेने बोधेगावसह शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शेवगाव तालुक्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला छापा टाकावा लागत असल्याने शेवगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उभे राहीले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागी आठवड्यापासून छापा सत्र सुरू केले आहे. दोन दिवसापुर्वी शेवगाव शहरातील लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर छापा टाकल्यानंतर आज बुधवारी तालुक्यातील बोधेगाव येथील पान टपर्यांवर छापा टाकून चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या पान टपर्यामध्ये अवैधपणे सुगंधी तंबाखू मिश्रीत मावा विक्री करण्यात येत होती.
याबाबत समजलेली हकीगत अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अनिल कटके यांचे आदेशाने पोना. सचिन आडबल, पोकॉ. प्रकाश गणपत वाघ, पोकॉ. जालिंदर मुरलीधर माने, पोकॉ. विनोद शिवाजी मासाळकर हे खाजगी वाहनाने शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बोधेगाव येथे आले असता राजेंद्र पंढरीनाथ शिंदे हा बोधेगाव बसस्टॅण्ड जवळ गौरव पान स्टॉल, लतीफ बाबा शेख हा मारुती मंदिरा समोर पाकिजा पान सेंटर, रम्मू बाबा शेख हा न्यू पाकिजा पान सेंटर व जमीर रशिद शेख हा बाजारतळासमोर असलेल्या सहारा पान स्टॉलमध्ये राज्यात तंबाखूजन्य पदार्थ तसेच सुगंधी तंबाखू मिश्रीत तयार मावा विक्री करण्यास प्रतिबंध असतांना अवैधपणे विक्री करतांना आढळून आले.
या वरील चार पान स्टॉलवर स्थानिक गुन्हे शाखेने पंचासमक्ष छाोा टाकून 16 हजार 900 रुपये किंमतीचा सुपारीचा चुरा व तयार मावा आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करून राजेंद्र पंढरीनाथ शिंदे (रा. घोरतळे गल्ली, बोधेगाव), लतीफ बाबा शेख (रा. भराट गल्ली, बोधेगाव), रम्मु बाबा शेख (रा. भराट गल्ली, बोधेगाव) व जमिर रशिद शेख (रा. घुले मंगल कार्यालयासमोर, बोधेगाव) यांच्यावर भादंवि कलम 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेवगाव तालुक्यात अवैध धंदे बोकाळले असून गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे हत्या व आत्महत्या, चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक छापा टाकून कारवाई करत आहे. मात्र हे अवैध धंदे शेवगाव पोलिसांना कळत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
I noticed that your veerbhuminews.com website could be missing out on approximately 1K visitors daily. Our AI powered traffic system is tailored to enhance your site's visibility: https://ln.run/VZn5V We're offering a free trial that includes four thousand targeted visitors to show the potential benefits. After the trial, we can supply up to 250,000 targeted visitors per month. This service could greatly enhance your website's reach and engagement.