अहमदनगर । वीरभूमी- 26-Aug, 2021, 12:00 AM
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पाऊस सरासरीपेक्षा कमी (Rainfall below average) आहे. यामुळे ऑगस्ट महिण्यात पुर्ण क्षमतेने भरणारे जिल्ह्यातील धरणांपैकी एकही धरण पुर्ण क्षमतेने भरू शकले नाही (No dam could fill to full capacity).
तरी धरणाच्या लाभक्षेत्रात अधूनमधून पडणार्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत (Dam water level) वाढ होत आहे. आज गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मुळा धरण (mula dam) 72.75 टक्के, भंडारदरा (bhandardara dam) 88.19 टक्के, निळवंडे (nilvande dam) 71.22 टक्के, आढळा (adhala dam) 52.64 टक्के असा पाणीसाठा झाला आहे.
राज्यातील इतर भागात समाधानकारक पाऊस झाला असली तरी अहमदनगर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अत्यल्प आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिण्यात जिल्ह्यातील धरणे पुर्ण क्षमतेने भरलेली असतात. मात्र यावर्षी ऑगस्ट महिना संपत आला तरी एकही धरण पुर्ण क्षमतेने भरलेले नाही. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील धरण लाभक्षेत्रात अधून मधून पडणार्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी हळू हळू वाढत आहे. गेल्या चोवीस तासात धरणाच्या लाभक्षेत्रातील भंडारदरा 4 मी.मी., रतनवाडी 7 मी. मी., वाकी 2 मी.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. मात्र घाटघर, पांजरे, निळवंडे, आढळा, अकोले या भागात पाऊस झाला नाही.
गुरुवार दि. 26 ऑगस्ट 2021 च्या सकाळी 6 वाजेपर्यंत भंडारदरा धरणसाठा 9735 टीएमसी (88.19 टक्के) झाला आहे. निळवंडे धरणातील पाणीसाठा 5931 टीएमसी (71.22 टक्के) झाला आहे. आढळा धरणात 558 टीएमसी (52.64 टक्के) झाला आहे.
पाणलोट क्षेत्रात अधून मधून पडणार्या पावसामुळे मुळा धरणात मुळा नदी पात्रातून 631 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे मुळा धरणाचा पाणीसाठा 18917 टीएमसी (72.75 टक्के) झाला आहे. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोतूळ व मुळानगर येथे पावसाने उघडीप दिली आहे.
जिल्ह्यात इतर भागात पाऊस नसला तरी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी धरण साठा वाढण्याची प्रतिक्षा करत आहेत. धरण पुर्ण क्षमतेने कधी भरेल याकडे लाभधारक शेतकर्यांच्या नजरा आहेत.
रविवार दि. 29 ऑगस्ट पासून जिल्ह्यात समाधानकार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या काळात पाऊस पडला तर धरणातील पाणीपातळी वाढेल. मात्र पाऊस झाला नाहीतर काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
HvYbnNRQwtJCqIG