पाथर्डी तालुक्यातील या गावातील घटना । लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त
पाथर्डी । वीरभूमी- 29-Aug, 2021, 12:00 AM
पाथर्डी (pathardi) तालुक्यातील शंकरवाडी (shankarvadi) येथील उसाच्या शेतात तब्बल अर्धा टनापेक्षा जास्त (500 किलो पेक्षा जास्त) गांजा (hemp) असलेली पोलिसांनी छापा टाकून पकडली. ही कारवाई शेवगाव उपविभागिय अधिकारी सुदर्शन मुंढे (Shevgaon Sub-Divisional Officer Sudarshan Mundhe) यांच्या पथकाने रविवारी सकाळी केली.
एवढा मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील मिरी जवळील शंकरवाडी येथील बापू आव्हाड आणि साहेबराव आव्हाड यांच्या मालकीच्या उसाच्या शेतात गांजाची पोती लपवून ठेवलेली आहेत. अशी माहिती गुप्त खबर्यामार्फत पोलिस उपविभागिय अधिकारी सुदर्शन मुंढे यांना समजली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी स्वतः पाथर्डी व सोनई पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला.
शंकरवाडी येथील सदरील ठिकाणी छापा टाकला असता ऊसाच्या शेतामध्ये तब्बल 500 किलो पेक्षा जास्त (अर्धा टनापेक्षा जास्त) गांजा असलेली पोती पोलिसांना आढळून आले. याची किंमत लाखो रुपये असून पोलिसांनी ती पोती जप्त केली.
या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र उसाच्या शेतात लाखो रुपयाचा गांजा आढळल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
QsywqTODpcbWl