श्रीरामपूर । वीरभूमी- 29-Aug, 2021, 12:00 AM
श्रीरामपूर (Shrirampur) शहरालगत असलेल्या गोंधवणी (gondhavani) येथे आज रविवारी पहाटे च्या सुमारास गावठी हातभट्टी (Hatbhatti) करण्यात येत असल्याची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke) यांच्या पथकाने छापा टाकून तब्बल 2 लाख 13 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तब्बल 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भल्या पहाटे केलेल्या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईचे नागरिकांमधून कौतूक होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूरचे उपविभागिय अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत श्रीरामपूर शहरातील गोंधवणी येथे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यात येत असल्याची माहिती समजली. या माहितीच्या आधारे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पथकासह आज रविवार दि. 29 रोजी भल्या पहाटे छापा टाकून गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठीचे कच्चे रसायन, तयार हातभट्टीची दारू असा 2 लाख 13 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी अशोक काशिनाथ शिंदे, अशोक सीताराम गायकवाड, राजेंद्र फुलारे, दिलीप नाना फुलारे, सुरेश फुलारे यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भल्या पहाटे अचानक केलेल्या या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाईचे सर्व स्तरातून पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक होत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पीएसआय राजेंद्र आरोळे, एएसआय सुरेश औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, श्याम बनकर, आदिनाथ चेमटे, प्रदीप गर्जे, सलमान कादरी, गौतम दिवेकर, आर. सी. पी. पथक आदींनी केली.
Is your website, veerbhuminews.com, failing to grab the traffic it deserves? Thousands of interested visitors go untapped daily when sites lack the reach they need. Our next-level traffic solution changes that—sending high-value visitors right to your doorstep. Dive in with a risk-free 4,000-visitor preview and experience four thousand hand-picked visitors flood your site. Love the results? Scale effortlessly to 350,000 hits monthly with our advanced packages. Let’s turn missed traffic into measurable success. Learn how here: https://shorten.ee/zc7j2