पंजाब डक यांचा अंदाज । काळजी घेण्याचे आवाहन
अहमदनगर । वीरभूमी- 02-Sep, 2021, 12:00 AM
राज्यात दि. 3, 4 व 5 या दिवशी हवामान कोरडे (The weather is dry) राहणार असून सूर्यदर्शन होणार आहे. मात्र दि. 6 ते 9 सप्टेंबर या कालावधीत अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डक (Forecast weather practitioner Punjab Duck) यांनी व्यक्त केला आहे.
या कालावधीत धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस पडणार (There will be heavy rain in the catchment area of the dam) असून नदी काठच्या रहिवाश्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान तज्ञ पंजाब डक यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा सर्व विभागात दि. 6 ते 9 सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तत्पुर्वी दि. 3 ते 5 सप्टेंबर हे तीन दिवस हवामान कोरडे असणार आहे.
या तीन दिवसाच्या कालावधीत सूर्यदर्शन होणार आहे. मात्र त्यानंतर दि. 6, 7, 8 व 9 सप्टेंबर 2021 या कालावधीत मुसळधार पाऊस पडणार आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिने हे पावसाचे असून या काळात धरणातील पाणीसाठा वाढणार आहे. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी व्यक्त केला आहे.
जोरदार पावसाचा अंदाज असल्याने या काळात नदी काठच्या गावांनी व नदी काठी राहणार्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. विजा चमकत असल्यास शेतातून सरळ घरी यावे. या दरम्यान झाडाखाली उभे राहु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील आठवड्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी व्यक्त केला होता. त्याप्रमाणे अनेक भागात जोरदार पाऊस झाला. एकाच दिवसात पावसाने उचांक केला. नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत.
या जोरदार पावसामुळे अनेक भागात नदी काठच्या गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे नदी काठच्या भागातील पिकांसह जमिनीचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक घरांचे नुकसान झाले असून शेतकर्यांचे जनावरे वाहुन गेले आहेत.
Comments