संगमनेर दोनशे पार । पारनेरसह श्रीगोंदा शंभरी पार
अहमदनगर । वीरभूमी- 02-Sep, 2021, 12:00 AM
नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील कोरोना (corona) बाधितांचा आकडा आज वाढला (The number increased today) आहे. आज गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) एकुण 901 कोरोना बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये संगमनेरने (sangamner) दोनशेचा आकडा पार केला आहे. तर पारनेर (parner) व श्रीगोंदा (shrigonda) तालुके शंभरच्या पुढे आहेत. इतर तालुक्यातील बाधितांचा आकडा कमी असला तरी एकुण आकडेवारी वाढल्याने चिंता (Anxiety over rising statistics) व्यक्त केली जात आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 330, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 287 तर अँटीजेन चाचणीत 284 असे 901 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 209, पारनेर 136, श्रीगोंदा 130, पाथर्डी 80, अकोले 60, राहाता 46, शेवगाव 37, राहुरी 34, जामखेड 31, नेवासा 29, नगर ग्रामीण 28, कोपरगाव 23, श्रीरामपूर 18, नगर शहर 15, कर्जत 13, इतर जिल्हा 11, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
xnCMKjAfJ