अखेर नेप्ती येथील कांदा लिलाव पुर्ववत
अहमदनगर । वीरभूमी- 03-Sep, 2021, 12:00 AM
वाराई हमालीच्या वादामुळे शनिवार पासून अहमदनगर बाजार समितीच्या (Ahmednagar Market Committee) नेप्ती येथील कांदा लिलाव (Onion auction at Nepti) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र आज शुक्रवारी बाजार समिती प्रशासन, माजी आ. शिवाजी कर्डिले, व्यापारी अशोशिएशन व ट्रान्सपोर्ट असोशिएशन (Merchant Association and Transport Association) यांच्यात बैठक होऊन शनिवारपासून कांदा लिलाव बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे (The decision to close the onion auction was reversed).
यामुळे नेप्ती येथील कांदा लिलाव पुर्ववत करण्यात आले आहेत. या निर्णयाचे शेतकर्यांमधून स्वागत करण्यात येत आहेत.
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि व्यापारी यांच्यातील वाराई वादामुळे कांदा लिलाव गुरुवारी अचानक बंद झाला. कांदा लिलाव बंद झाल्यामुळे संतप्त शेतकर्यांनी बाह्यवळण रस्त्यावर आंदोलन केले होते.
या दरम्यान व्यापारी व ट्रान्सपोर्ट असोशिएशनमधील वाराईच्या वादामुळे शनिवार दि. 4 सप्टेंबर 2021 पासून नेप्ती येथील कांदा लिलाव बंद ठेवण्याबाबत बाजार समितीने कळविले होते. मात्र यामध्ये शेतकर्यांचे नुकसान होणार होते.
याचा विचार करून माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी ट्रान्सपोर्ट असोसिएशन, व्यापारी व बाजार समिती यांच्यात समन्वय बैठक घडवून आणली. या बैठकीला माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्यासह बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सचिव सचिव अभय भिसे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाबा सानप, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर शिकारे यांच्यात बैठक झाली.
यावेळी वाराईच्या वादावर तोडगा काढण्यात आला. दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी राज्य पातळीवर वाराई प्रश्नावर बैठक आहे. या बैठकीत जो निर्णय होईल त्याबाबत दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी अहमदनगर येथे बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाराईचा निर्णय होईपर्यंत प्रचलित पद्धतीने काम सुरू ठेवण्यावर सर्वांचे एकमत झाले. यामुळे शनिवार दि. 4 सप्टेंबर रोजी होणारा कांदा लिलाव पुर्ववत होणार असल्याचे बाजार समितीने कळविले आहे.
मात्र दि. 8 सप्टेंबर रोजी वाराईबाबत काय निर्णय होतो याकडे व्यापार्यांसह शेतकर्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
Comments