अहमदनगर । वीरभूमी- 03-Sep, 2021, 12:00 AM
अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यात आज शुक्रवारी तब्बल 746 कोरोना (corona) बाधित आढळले. तर आज 769 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे सध्या अॅक्टिव रुग्णांची संख्या 5 हजार 751 वर आली आहे. तर आतापर्यंत तब्बल 3 लाख 13 हजार 562 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामुळे रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 96.22 टक्के इतके झाले आहे. तर आतापर्यंत तब्बल 3 लाख 25 हजार 880 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आज शुक्रवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 165, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 328 आणि अँटीजेन चाचणीत 253 रुग्ण असे हकुण 746 कोरोना बाधीत आढळले आहेत.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर 130, श्रीगोंदा 89, पारनेर 84, अकोले 78, शेवगाव 47, नेवासा 46, नगर ग्रामीण 42, पाथर्डी 42, राहाता 39, राहुरी 33, जामखेड 27, नगर शहर 23, श्रीरामपूर 20, कर्जत 17, कोपरगाव 15, इतर जिल्हा 11, भिंगार काँटेन्मेन्ट 02, मिलिटरी हॉस्पिटल 01 असे रुग्ण आढळले.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 23, अकोले 64, जामखेड 13, कर्जत 43, कोपरगाव 12, नगर ग्रा. 61, नेवासा 39, पारनेर 62, पाथर्डी 35, राहाता 46, राहुरी 45, संगमनेर 216, शेवगाव 41, श्रीगोंदा 49, श्रीरामपूर 11, कँटोन्मेंट बोर्ड 01 आणि इतर जिल्हा 08 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल 3 लाख 25 हजार 880 कोरोना बाधित आढळले आहेत. तर आतापर्यंत 3 लाख 13 हजार 562 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत उपचार सुरू असतांना 6 हजार 567 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर सध्या 5 हजार 751 जणांवर उपचार सुरू आहेत.
taqeOYjoGKUX