राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन
पाथर्डी । वीरभूमी- 04-Sep, 2021, 12:00 AM
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (Annual General Meeting of Vriddheshwar Sahakari Sugar Factory) घेतलेल्या विषय पत्रिकेतील काही विषयांबाबत ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांचा तीव्र विरोध आहे (Strong opposition from sugarcane growers and members).
त्याबाबतचे निवेदन कारखाना प्रशासनास राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे (Shivshankar Rajale) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणुन ओळख असलेल्या आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 4 रोजी आयोजित करण्यात आली होती. या वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेतील काही विषयांना ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, इथेनॉल/डीस्टीलरी प्रकल्पाला कोणाचाही विरोध नाही. परंतु त्याचे भागभांडवल उसपेमेंट मधून वजा न करता बँक कर्ज उभारावे किंवा ऐच्छिक शेअर्स जमा करावेत. एफआरपीची रक्कम हाप्त्यात न देता एकरकमी द्यावी.
तसेच कारखान्याच्या भागाची (शेअर्सची) दर्शनी किंमत 10 हजार रुपये आहे, त्यात तूर्तास वाढ करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच या गाळप हंगामात साखर कारखाना 1 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू करून कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य द्यावे. अतिवृष्टीमुळे पडलेल्या उसाला सुरुवातीला तोड द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुकध्यक्ष शिवशंकर राजळे, शेतकरी संघटनेचे शरद मरकड, बाळासाहेब गर्जे, सोमनाथ गर्जे, संदीप राजळे, सतीश गर्जे, संतोष खोर्दे आदींच्या सह्या आहेत.
aGWjnmDlV