शेळी व बोकडाचा बिबट्याने पाडला फडश्या
संगमनेर । वीरभूमी- 07-Sep, 2021, 12:00 AM
घराच्या समोरील अंगणात बांधलेल्या एक शेळी व बोकड्यावर दोन बिबट्यांनी हल्ला करून ठार केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील हजारवाडी (पानोडी) येथे सोमवारी रात्री साडे तीन वाजेच्या दरम्यान घडली.
सध्या हजारवाडी परिसरात वाघाने धुमाकुळ घातला असून त्यामुळे पशुपालकांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण निर्माण असून वाघाचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
हजारवाडी येथील सखाराम लक्ष्मण सानप यांची शेळी व बोकड्या घराच्या अंगणामध्ये बांधून ठेवलेले होते. रात्री सगळे झोपी गेलेले असतांना साडे तीन वाजेच्या सुमारास दोन बिबट्यांनी अंगणात बांधलेल्य्या बोकड्या व शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात शेळीचा जागीच फडशा पाडला तर बोकड्याला ठार करून ओढत डोंगराकडे घेवून गेले.
मात्र उशिरा पर्यंत बोकड्याचा पत्ता लागलेला नव्हता. या बोकड्याची व शेळीची किंमत अंदाजे 18 हजार रुपये असून बिबट्याच्या हल्ल्यात सानप यांचे पशुधन गेल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर बिटरक्षक वाडेकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. पशुपालकाला वनविभागाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
या अगोदर परिसरातील अनेक ठिकाणी कुत्रे, शेळ्य्याचा फडशा पाडून डोंगराच्य्या कपर्यात जावून आश्रय घेत आहे. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून पानोडी, हजारवाडी परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांसह पशुपालक चिंतेत आहेत.
वनविभागाकडे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी भारत शेवाळे यांनी केली आहे.
Comments