आत्महत्ये अगोदर फोन - पे ने एका व्यक्तीला पाठवले हजारो रुपये
शेवगाव । वीरभूमी- 08-Sep, 2021, 12:00 AM
शेवगाव (shevgaon) तालुक्यातील बालमटाकळी (balamtakali) येथील आदित्य अरुण भोंगळे (वय 20 वर्षे) या तरुणाने राहत्या घराशेजारी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by strangulation) केली. या घटनेने बालमटाकळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिसांनी (shevgaon police) मंगळवार दि. 7 रोजी छापा टाकून गावठी कट्टा, दोन जीवंत काडतूस (Gawthi Katta, two live cartridges) व दोन चोरीच्या दोन दुचाकीसह दोघांना अटक केली होती. गावठी कट्टा व चोरीच्या दुचाकी आढळल्याने यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का नाही, याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
त्यातच बालमटाकळी येथील आदित्य अरुण भोंगळे (वय 20 वर्षे) या तरुणाने मंगळवार दि. 8 रोजी रात्री आपल्या राहत्या घराशेजारीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्याअगोदर फोन-पे या डिजीटल बँकिंग सुविधेने एका व्यक्तीला चांगली मोठी रक्कम पाठविली होती, असे आदित्य भोंगळे याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
या पैशाच्या व्यवहारातूनच आदित्य याने आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. फोन-पे ने पैसे कोणी स्विकारले याचा पोलिसांनी शोध घेऊन तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आदित्य भोंगळे याचे कुटुंबिय व नातेवाईक शेवगाव पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत.
मंगळवारी बालमटाकळी येथून गावठी कट्टा, दोन जीवंत काडतूस व चोरीच्या दुचाकीसह दोघांना अटक केल्यानंतर ही आत्महत्येची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे यावरुन दिसत आहे. हा परिसर मराठवाडा हद्दीलगत येत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होऊन गुन्हेगारीत वाढ झाली असल्याचे नागरिकांचे महणणे आहे.
QgdPcyMoVB