अहमदनगर । वीरभूमी- 08-Sep, 2021, 12:00 AM
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोरोना (corona) बाधितांचा आकडा आजही वाढताच राहीला आहे. आज बुधवारी जिल्ह्यात एकुण 857 कोरोना बाधित आढळले. वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता वाढत आहे (Anxiety is on the rise.).
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेर (sangamner) तालुक्याने 216 चा आकडा गाठला आहे. तर पारनेर (parner) तालुक्याचा आकडा शंभरच्या पार गेला आहे. यामुळे जिल्हावाशियांची चिंता कायम आहे.
संगमनेर, पारनेरनंतर श्रीगोंदा, अकोले, शेवगाव, नेवासा, कर्जत, पाथर्डी असा क्रमांक लागतो. राज्यातील आकडेवारीत अहमदनगर जिल्हा अव्वलस्थानी राहत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 226, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 279 तर अँटीजेन चाचणीत 352 असे 857 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 216, पारनेर 102, श्रीगोंदा 75, अकोले 71, शेवगाव 62, नेवासा 59, कर्जत 49, पाथर्डी 45, राहुरी 29, नगर ग्रामीण 26, राहाता 24, जामखेड 22, नगर शहर 21, कोपरगाव 21, श्रीरामपूर 21, भिंगार 07, इतर जिल्हा 07 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
Comments