संगमनेर दुसर्या स्थानावर । कोरोना बाधितांचा आकडा घटता घटेना
अहमदनगर । वीरभूमी- 11-Sep, 2021, 12:00 AM
अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यात आज शनिवार दि. 11 सप्टेंबर रोजी आढळलेल्या कोरोना (corona) बाधितांमध्ये अकोले (akole) तालुका टॉपवर आला आहे. आज जिल्ह्यात तब्बल 776 कोरोना बाधित आढळल्याने नगरकरांची चिंता कायम आहे.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये अकोले (akole) तालुका प्रथम क्रमांकावर पोहचला असून त्याखालोखाल संगमनेरचा (sangamner) दुसरा क्रमांक लागतो. तर तिसरा क्रमांक पारनेर (parner) तालुक्याचा लागतो.
जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांचा आकडा घटत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 155, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 361 तर अँटीजेन चाचणीत 260 असे 776 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- अकोले 137, संगमनेर 118, पारनेर 78, श्रीगोंदा 69, नेवासा 59, शेवगाव 50, राहाता 49, नगर शहर 34, कर्जत 34, नगर ग्रामीण 27, पाथर्डी 26, इतर जिल्हा 23, राहुरी 21, श्रीरामपूर 20, कोपरगाव 18, जामखेड 12, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
cRCMJBnTWQm