डॉ. क्षितिज घुले युवा मंचच्या मागणीला यश
वीरभुमी - प्रतिनिधी 11-Sep, 2021, 12:00 AM
काळ्या ओढ्यातील रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी केलेला पाठपुरावा आणि डॉ क्षितिज भैय्या घुले युवा मंचाच्या वतीने पाण्यात उतरण्यासाठी देण्यात आलेला पाच दिवसाचा अल्टीमेटम यामुळे आज दि.११ रोजी शेवगांव विभागाचे उपविभाग आभियंता यांनी (फरशी) ओढ्या च्या रस्त्यावर नळ्या टाकून वाहतूक सुरळीत करण्याकरीता सिमेंट नळ्या आणुन टाकण्याचे काम हाती घेतले आले आहे.
कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसताना घुले युवा मंचची मागणी आणि रस्त्यातील वाहतुकदारांचे होत असलेले हाल लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय आभियंता अंकुश पालवे यांनी काळ्या ओढ्यातील रस्त्यावर नळ्या टाकण्याचा निर्णय घेतला आज ही बातमी वाहतूक दारामध्ये पसरताच त्यांनी घुले युवा मंचचे आभार मानत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत आसल्याने सुटकेचा निश्वास सोडला.
गेल्या वर्षभरापासून या ओढ्यातील स्थानिक मंडळे आणि काही पक्षाच्या वतीने रस्त्यासाठी निवेदन दिली परंतु स्थानिक आणि लोकप्रतिनिधीनी मात्र याकडे कानाडोळा केला केल्याचे सोशल मेडीयातुन व्हारल करण्यात आले. या व्हायरल पाशी आडुन न बासता डॉ क्षितिज भैय्या युवा मंचचे पदाधिकारी सचिन घोरतळे, संतोष पावसे, अनिल घोरतळे, सिद्धांत घोरतळे, चेतन देशमुख, मोहित पारनेरे, , सुमित दसपुते , अर्जुन दराडे आदीनी या संदर्भात पंचायत सामितीचे सभापती डॉ. क्षितिज भैय्या घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगांव -गेवराई रोडवरील वाहतूक सुरळीत होण्याकामी तात्पुरत्या स्वरुपातील काम करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.
दरम्यान पाण्यात उतरण्याचा देण्यात आलेल्या पाच दिवसाच्या अल्टीमेटममुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आज दि.११ रोजी सिमेंटच्या नळ्या आणुन टाकण्याचे काम हाती घेतले. आज आणि उद्या या सिमेंट नळ्या काळ्या ( फरशी ) ओढ्याच्या रस्त्यावर टाकून पाण्याला आणि वाहतुकिला वाट मोकळी करून देण्यात येणार असल्याचे सा बा वि कडुन संगण्यात आले.
दरम्यान या कामामुळे वाहतूकदारामधुन आनंद व्यक्त केला जात आसुन डॉ. क्षितिज भैय्या घुले युवा मंचला धन्यवाद देण्यात येत आहेत.
Comments