श्रीगोंदा दुसर्या तर पाथर्डी तिसर्या स्थानावर
अहमदनगर । वीरभूमी- 13-Sep, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) एकुण आकडेवारीत आज घट झाली आहे. मात्र संगमनेर (sangamner) तालुक्याचा आकडा शंभरच्या पुढे असल्याने चिंता कायम आहे. आज सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात एकुण 619 कोरोना बाधित आढळले आहेत (Corona are found to be infected).
रविवारच्या तुलनेत एकुण आकडेवारीत घट झाली आहे. आज आढळलेल्या आकडेवारीत संगमनेर शंभरी पार असून टॉपवर आहे. श्रीगोंदा (shrigonda) तालुका दुसर्या तर पाथर्डी (pathardi) तालुका तिसर्या क्रमांकावर आला आहे.
आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 125, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 295 तर अँटीजेन चाचणीत 199 असे 619 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 121, श्रीगोंदा 70, पाथर्डी 64, नेवासा 55, शेवगाव 50, पारनेर 42, अकोले 41, श्रीरामपूर 31, नगर ग्रामीण 29, कर्जत 28, नगर शहर 27, कोपरगाव 15, जामखेड 13, राहुरी 13, इतर जिल्हा 08, राहाता 08, भिंगार 04 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
Comments