किरिट सोमय्या यांची पत्रकार परिषद
मुंबई । वीरभूमी- 13-Sep, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Ahmednagar District) तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hassan Mushrif) यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गैरव्यवहार केल्याचा निशाणा साधला (Targeted for abuse) आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबत आज पत्रकार परिषद (Press conference) घेऊन मुश्रीफांवर आरोप केले आहेत.
या आरोपामध्ये सरसेनापती या खाजगी साखर कारखान्यामध्ये ताहेरा हसन यांच्या नावाने हसन मुश्रीफ यांचे शेअर्स असल्याचे समोर आले आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी आयकर विभागाकडे हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत पुरावे सादर केले आहेत.
यामध्ये सीआरएम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडमधून हसन मुश्रीउ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटीचे कर्ज घेतले आहे. असे नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेला आहे.
त्यातच सीआरएम सिस्टीम मधून कर्ज घेणार्यांवर आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. सन 2017 साली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाने धापा टाकून 127 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.
असे आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केले असून या आरोपाला आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ हे उत्तर देणार आहेत.
bvqpmMRU