महसूल कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचार्यांना वाळू तस्करांची धक्काबुक्की
श्रीगोंदा । वीरभूमी- 17-Sep, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज (Ajnuj in Shrigonda taluka) येथील घोडनदी पात्राजवळ (Near Ghodnadi Patra) वळणेश्वर मंदिराजवळ बुधवार दि. 15 सप्टेंबर रोजी जिल्हा गौण खनिज पथकातील कर्मचारी, पोलिस व होमगार्ड यांना पकडलेला ट्रक ताब्यात घेताना वाळू तस्करांनी धक्काबुक्की (Sand smugglers push revenue staff and home guards), शिवीगाळ करून हुसकावून दिले व वाळू ट्रक घेऊन पसार झाले.
याबाबत तलाठी सचिन बळी (Talathi Sachin victim) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक अक्षय सुनिल डाळिंबे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा (The crime of obstructing government work) दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजनुज शिवारातील वळणेश्वर मंदिराजवळ अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक फसला होता. जिल्हा गौण खनिज पथक व पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत असताना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास जिल्हा गौणखनिज पथकाचे प्रमुख अकोले येथील नायब तहसीलदार खातले यांनी रस्त्यातील खड्ड्यात वाळू वाहतूक करणारा एक हायवा खचला असून तो ताब्यात घ्या, असे आदेश तलाठी सचिन प्रभाकर बळी यांना फोनवरून दिले.
तलाठी बळी तातडीने आपल्या सोबत मंडळाधिकारी डहाळे, तलाठी मनोज मिसाळ आणि होमगार्ड अक्षय काळे यांना घेवून घटनास्थळी रवाना झाले. जिल्हा गौणखनिज पथकाने पिवळा राखाडी रंगाचा 5 लाख रुपये किंमतीचा हायवा नंबर (एमएच.42, एक्यू 8883) व 26 हजार रुपये किंमतीची हायवामधील 4 ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पकडला होता.
जिल्हा गौणखनिज पथकाचे प्रमुख खातले यांनी हायवावर कारवाई करण्याचे आदेश देवून त्याब्यात घेण्यास सांगितले. यावेळी होमगार्ड काळे यास हायवामध्ये बसवून हायवा तहसील कार्यालयाकडे नेण्यास ड्रायव्हर अक्षय सुनिल डाळिंबे याला सांगितले.
त्यावेळी ड्रायव्हर अक्षय सुनिल डाळिंबे, हायवाचा मालक व इतर 4 अनोळखी इसमांनी फिर्यादी व साक्षीदार होमगार्ड अक्षय कांबळे यांना शिवीगाळी, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण करुन हायवा गाडीमधुन खाली उतरण्यास भाग पाडून होमगार्ड अक्षय काळे यास खाली उतरवले व गाडी घेऊन पसार झाले. यामुळे तलाठी सचिन प्रभाकर बळी यांना रिकाम्या हाताने परत यावे लागले.
याप्रकरणी तलाठी सचिन बळी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चालक अक्षय सुनिल डाळिंबे व इतर 4 अनोळखी व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments