जिल्ह्यातील या पालिकेचे दोन नगरसेवक भाजपाकडून निलंबित
नेवासा । वीरभूमी- 26-Sep, 2021, 12:00 AM
नेवासा नगरपंचायतीमधील (newasa municipality) भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडून आलेले (Elected on the lotus symbol of the Bharatiya Janata Party) रणजीत दत्तात्रय सोनवणे व दिनेश प्रताप व्यवहारे (Ranjit Dattatraya Sonawane and Dinesh Pratap vyavhare) या दोन नगरसेवकांना पक्षविरोधी काम केल्याने भारतीय जनता पार्टीतून निलंबित (Suspended from Bharatiya Janata Party for anti-party activities) करण्यात आले असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर (District President Rajendra Gondkar) यांनी केली.
नेवासा नगरपंचायतीची दुसरी निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर व तालुका भाजप अग्रेसर झालेले दिसून येत आहे. भाजपच्या तीन बैठका झाल्या असून त्यात प्रभाग निहाय अभ्यास व संपर्क सुरू करण्यात आलेला आहे.
नेवासा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी त्यांची निवड झाल्यावर शहराध्यक्षांसह शहर चिटणीसांचे पक्षाातून निलंबन केले होते.
आता नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर दोन नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 15 मधून एकतर्फी निवडून आलेले दिनेश व्यवहारे व प्रभाग क्रमांक 9 मधून केवळ एक मताने निवडून आलेले रणजीत सोनवणे अशी निलंबित नगगरसेवकांची नावे आहेत.
या निलंबन कारवाईच्या पत्रकात म्हटले आहे की, या दोन्ही उमेदवारांच्या 2017 सालच्या विजयामध्ये पक्षाचा मोठा वाटा होता. त्यानंतर वेळोवेळी पक्ष्याच्या पदाधिकार्यांकडून निरोप येऊनही पक्ष कार्यक्रमात उपस्थित न राहता विरोधकांच्या कार्यक्रमात हे दोघेही उपस्थित राहत होते.
त्यांचे पक्षविरोधी काम सुरू असल्याने दखल घेऊन पक्षाने या दोन नगरसेवकांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
VZjqSfPTHUOe