पाथर्डी तहसील कार्यालयाकडे जाणार्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गांधीगीरी
पाथर्डी । वीरभूमी- 28-Sep, 2021, 12:00 AM
पाथर्डी तहसील कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यावर व परीसरात पाणी साचत आहे. रस्त्यावरील चिखल, दलदल, अस्वच्छता यामुळे नेहमी वर्दळ असलेला भाग व रस्ता खड्डेमय झाला आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी पाथर्डी तालुका शिवसंग्राम पक्षाच्यावतीने खड्ड्याला हार घालून गांधीगिरी करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले, प्रकाश कचरे, भारत भोईटे, मनसेचे शैलेश शिंदे, बाळासाहेब केदार, आविनाश हाडके, किशोर लांडगे आदी उपस्थित होते.
पाथर्डी तहसील कार्यालयाचा कारभार प्रशस्त व नूतन इमारतीमधून सुरू आहे. मात्र तहसील कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यांवर सतत पडणार्या पावसामुळे चिखल व खड्डेमय बनला आहे. यामुळे पाथर्डी तहसील कार्यालयाकडे व पोलिस ठाण्याकडे जाणार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या बाजुला सेतू कार्यालये, झेरॉक्स दुकाने आहेत. या दुकानांकडे जातांनाही रस्त्यावरील चिखल व खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. तसेच शासकीय कामांसाठी आलेल्या प्रत्येकाला याचा त्रास होतो.
तालुका प्रशासनाच्या इमारतीकडे जाणार्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करत शिवसंग्राम पक्षाच्यावतीने रस्त्यावरील खड्ड्यांना फुले वाहून हार अर्पण करत गांधीगीरी करत आंदोलन केले.
mdZqVItzQPL