वाचा पंजाब डख यांचा पावसाबाबतचा अंदाज
अहमदनगर । वीरभूमी- 01-Oct, 2021, 12:00 AM
सुमारे महिनाभरापासून जोरदार पावसाला शनिवार दि. 2 ऑक्टोबरपासून परतीच्या प्रवासाला लागणार आहे. यामुळे दसर्यापर्यंत पवासाचा परतीचा प्रवास पूर्ण होऊन त्यानंतर थंडी सुरू होईल. यामुळे दसर्यापर्यंत अधुन मधून हलकासा पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
सुमारे महिनाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीसह पिकांचे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता या पावसाच्या परतीच्या प्रवासाला दि. 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.
राज्यात परतीचा पाऊस पडेल मात्र तो खूप जोरदार असणार नाही. येणार्या दसर्यापर्यंत पावसाचा परतीचा प्रवास पूर्ण होऊन त्यानंतर थंडीला सुरुवात होणार आहे. पाऊस निघून गेल्यानंतर उरले सुरले पिक शेतकर्यांच्या हाती राहील.
पावसाने मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता परतीचा पाऊस सातारा, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर व कोकणपट्टी या भागाला पाऊस झोडपून जाईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
पावसाचा हा अंदाज असून वारे बदलले की वेळ व ठिकाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. वातावरणात काही बदल झाल्यास त्यावेळी सुचित करण्यात येईल, असे अभ्यासक पंजाब डख यांनी कळविले आहे.
xdDaicWsmGTvJ