अहमदनगर । वीरभूमी- 03-Oct, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे. आज रविवारी जिल्ह्यात एकुण 461 कोरोना बाधित आढळले. दोन दिवसापासून एकुण आकडेवारीत घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
आज आढळलेल्या आकडेवारीत पारनेर तालुका पुन्हा टॉपवर आला आहे. मात्र ही आकडेवारी 64 असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे. त्याचप्रमाणे संगमनेर दुसर्या तर श्रीगोंदा तिसर्या स्थानावर आहे. मात्र ही आकडेवारी शनिवारच्या तुलनेत कमी आहे.
मात्र पारनेर, कोपरगाव, नेवासा, राहुरी, पाथर्डी, नगर ग्रामीण, जामखेड तालुक्याच्या आकडेवारीत शनिवारच्या तुलनेत थोडीसी वाढ झाली आहे. मात्र ही आकडेवारी कमी असल्याने भितीचे कारण नाही. मात्र कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घीण्याची मरज आहे.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 109, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 227 तर अँटीजेन चाचणीत 125 असे 461 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 64, संगमनेर 50, श्रीगोंदा 42, कोपरगाव 34, राहाता 34, शेवगाव 31, नेवासा 28, राहुरी 27, पाथर्डी 26, नगर ग्रामीण 25, श्रीरामपूर 21, अकोले 19, कर्जत 17, इतर जिल्हा 15, नगर शहर 14, जामखेड 13, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित सॅनिटायझरचा वापर करावा.
xvSadYoUuL