लहान बालके, गरोदर स्त्रीया, वयोवृद्ध व आजारी व्यक्तींना प्रवेश नाही
अहमदनगर । वीरभूमी- 05-Oct, 2021, 12:00 AM
राज्य शासनाने दि. 7 ऑक्टोबरपासून मंदिरे व धार्मीक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील धार्मीक स्थळे उघडणार असली तर जिल्ह्यातील देवस्थांमध्ये 10 वर्षाखालील बालके, गरोदर स्त्रीया, 65 वर्षावरील, आजारी व्यक्तींना तसेच मास्क न वापरणार्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
तसेच मंदिर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना रात्री 8.30 वाजेनंतर बंद करण्यात याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
याबाबत शिर्डी येथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत पोलिस अधिक्षक, उपविभागिय पोलिस अधीकारी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व विभागाचे उपविभागिय अधिकारी, देवस्थान समितीचे मुख्याधिकारी, व्यवस्थापन मंडळ यांची बैठक घेऊन विविध सुचना देण्यात आल्या.
या बैठकीत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी म्हटले की, शासनाने ठरवून दिलेल्या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. दर्शन घेतांना प्रत्येकाने 6 फुटाचे अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा व वारंवार हात स्वच्छ धुवावे. भाविकांना मंदिरात प्रवेश देतांना त्यांची थर्मल स्कॅनिंगद्वारे शरीराचे तापमान तपासले जाणार आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे आढळणार्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच 10 वर्षाखालील बालके, गरोदर स्त्रीया, 65 वर्षावरील वयोवृद्ध व आजारी व्यक्ती तसेच मास्क न लावणार्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
तसेच मंदिरात प्रवेश करतांना कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्याची सक्ती केली जाणार नाही. मात्र मंदिरात प्रवेश करतांना पुजा साहित्य आणू नये. पुजा साहित्य असल्यास मंदिरात प्रवेश दिला जाणारा नाही. मात्र जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.
Painting contractor