पाथर्डी तालुक्यात स्वप्नवत असलेल्या प्रकल्पाचे भूमिपुजन
शेतकर्यांना, बेरोजगारांना न्याय देण्याचे काम केले जाणार ः आ. मोनिकाताई राजळे यांची ग्वाही
पाथर्डी । वीरभूमी- 11-Oct, 2021, 12:00 AM
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने संघर्ष करत ताठ मानेने पारदर्शी व काटकसरीने कारभार करत ऊस उत्पादक शेतकर्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यातच स्वप्नवत वाटणारा 30 के. एल. पी. डी. डिस्टलरी इथेनॉल प्रकल्पाचे आज संत महंताच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले आहे. भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्यांना, बेरोजगारांना न्याय देण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील श्री. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 30 के. 30 के. एल. पी. डी. डिस्टलरी इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन व सन 2021-22 या गाळप हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कराळे, ह. भ. प. दिनकर महाराज अंचवले, तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, येळेश्वर देवस्थानचे महंत रामगिरी महाराज, आखेगाव येथील जोग महाराज संस्थानचे महंत राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार मोनिकाताई राजळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे हे होते.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, ताराचंद लोढे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनील परदेशी, सुनील ओहोळ, सुभाष केकाण, सुनील रासने, अशोक आहुजा, प्रवीण राजगुरू, नंदकुमार शेळके, अजय रक्ताटे, सचिन नेहुल, जे. बी. वांढेकर, गोकुळ दौंड, मंगलताई कोकाटे, रविंद्र वायकर, पुरुषोत्तम आठरे आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. राजळे म्हणाल्या की, इथेनॉल प्रकल्प उभारणीचे खूप मोठे धाडस केले आहे. प्रकल्पासाठी अनेक अडचणींवर मात करत नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य राहीले आहे. 11 ते 14 महिण्यात इथेनॉल प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार संचालक मंडळाने केला आहे.
वृद्धेश्वर कारखान्याने अडचणीच्या काळातही एफआरपी प्रमाणे सर्व ऊस पेमेंट दिले आहे. या हंगामात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून या हंगामात 6 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्टे ठेवले आहे. तर अतिरीक्त ऊस इतर कारखान्यांना देण्याचे नियोजन केले आहे. वेळेवर ऊसतोडणी, वेळेवर एफआरपी देण्याची जबाबदारी आमची आहे. इथेनॉल प्रकल्पासाठी लागणारे स्वभांडवल उभारणीसाठी शेतकर्यांसह, व्यापारी, नोकरदार यांनी ठेव ठेवण्यास प्रारंभ केला आहे. या ठेवीसाठी कारखाना 9 टक्के दराने व्याज देणार असल्याचे आ. राजळे यांनी जाहीर केले.
मागील हंगामात ऊस तोडणीचे नियोजन कोलमडल्यामुळे ऊस तोडणीसाठी उशिर झाला. यामुळे अनेक शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागला, या बद्दल आमदार राजळे यांनी दिलगिरी व्यक्त करत, या हंगामाचे नियोजन पूर्ण झाले असून मागील चुका होणार नसल्याची ग्वाही दिली.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, संचालक उद्धव वाघ, बाळासाहेब गोल्हार, यशवंत गवळी, अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, कुशिनाथ बर्डे, शरद साखरे, साहेबराव खेडकर, सुभाष बुधवंत, काकासाहेब शिंदे, सिंधुताई जायभाये, उषाताई खेडकर, सौ. गोल्हार, साहेबराव सातपुते, शेषराव ढाकणे, जे. आर. पवार, भास्कर गोरे, प्रभारी कार्यकारी संचालक आर. जे. महाजन यांच्यासह सर्व संचालक, कामगार, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक राहुल राजळे यांनी केले. स्वागत संचालक सुभाष ताठे यांनी केले तर आभार श्रीकांत मिसाळ यांनी मानले.
Comments