अहमदनगर । वीरभूमी- 12-Oct, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीत आज मंगळवारी घट झाल्याने समाधानकारक परिस्थिती आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात एकुण 325 कोरोना बाधित आढळले.
आज आढळलेल्या आकडेवारीत राहाता तालुका टॉपवर असून दुसर्या स्थानावर संगमनेर तर तिसर्या स्थानावर राहुरी तालुके आहेत. विशेष बाब म्हणजे सर्व तालुके 64 च्या आत असल्याने समाधान मिळत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात काल सोमवारपर्यंत तब्बल 3 लाख 50 हजार 227 कोरोना बाधित आढळले असून सोमवारपर्यंत 3 लाख 40 हजार 531 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उपचार सुरू असतांना कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 6 हजार 934 वर पोहोचली आहे. तर सोमवारपर्यंत उपचार सुरू असलेल्या एकुण रुग्णांढ़ी संख्या 2 हजार 762 वर आली आहे.
आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 74, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 172 तर अँटीजेन चाचणीत 79 असे 325 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहाता 64, संगमनेर 60, राहुरी 34, पारनेर 23, शेवगाव 21, श्रीगोंदा 20, नगर ग्रामीण 19, कर्जत 16, अकोले 13, कोपरगाव 13, नगर शहर 09, जामखेड 09, नेवासा 09, इतर जिल्हा 05, पाथर्डी 05, श्रीरामपूर 05 असे कोरोना बाधित आढळून आले.
सोमवारपासून पुन्हा कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होऊ लागल्याने समाधान मिळत आहे. याचप्रमाणे प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास लवकरच संपुर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल. यासाठी प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे.
Comments