अहमदनगर । वीरभूमी- 13-Oct, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आजही थोडीसी घट झाली आहे. आज बुधवारी जिल्ह्यात एकुण 319 कोरोना बाधित आढळले आहे. यामुळे काही अंशी दिलासा मिळत आहे.
नगर जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत मंगळवारच्या तुलनेत घट झाली आहे. सर्व तालुक्यांची आकडेवारी 48 च्या आत आहे. यामुळे दिलासा मिळत आहे. मात्र एकुण आकडेवारी घटली असली तरी श्रीगोंदा, नेवासा, नगर ग्रामीण, शेवगाव, कोपरगाव, अकोले, नगर शहर, पाथर्डी, श्रीरामपूर, मिलटरी हॉस्पिटल येथील आकडेवारीत वाढ झाली आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात काल मंगळवारपर्यंत तब्बल 3 लाख 50 हजार 552 कोरोना बाधित आढळले असून मंगळवारपर्यंत 3 लाख 40 हजार 928 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उपचार सुरू असतांना मंगळवारी 16 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 6 हजार 950 वर पोहोचली आहे. तर मंगळवारपर्यंत उपचार सुरू असलेल्या एकुण रुग्णांची संख्या 2 हजार 674 वर आली आहे.
आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 67, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 197 तर अँटीजेन चाचणीत 55 असे 319 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 48, राहाता 37, श्रीगोंदा 30, नेवासा 27, नगर ग्रामीण 23, राहुरी 22, शेवगाव 22, पारनेर 21, कोपरगाव 20, अकोले 16, नगर शहर 14, पाथर्डी 09, श्रीरामपूर 09, कर्जत 07, जामखेड 06, इतर जिल्हा 06, मिलटरी हॉस्पिटल 02 असे कोरोना बाधित आढळून आले.
दोन दिवसापासून एकुण आकडेवारीत घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. मात्र मंगळवारच्या तुलनेत अनेक तालुक्यांची आकडेवारीत वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. यामुळे नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
XTChFMVnWa