या दिवशी ‘नागवडे’ कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ
श्रीगोंदा । वीरभूमी- 13-Oct, 2021, 12:00 AM
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 वर्षाचा 47 वा गळीत हंगामाचा गव्हाणपुजन व गाळप हंगाम शुभारंभ गुरुवार दि. 14 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
गाळप हंगामाचा शुभारंभ विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे, श्रीरामपूरचे आ. लहूजी कानडे व जिल्हा सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन अॅड. माधवराव कानवडे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे हे भूषवणार असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे व्हा. चेअरमन युवराज चितळकर यांनी दिली.
अधिक माहिती देताना चितळकर यांनी सांगितले की, सन 2021-22 चा गाळप हंगाम सुरु करण्याकरीता शासनाने 15 ऑक्टोबर पासुन परवानगी दिलेली आहे. त्या अनुषंगाने गाळप हंगाम वेळेत सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी केलेली असुन गुरुवार दि. 14 रोजी सकाळी 9 वाजता कारखान्याचे संचालक अॅड. सुनील कांतीलाल भोस व त्यांच्या सुविद्य पत्नी मिनाताई सुनील भोस तसेच कारखान्याचे सभासद विठ्ठलराव जिजाबा भोयटे व त्यांच्या सुविद्य पत्नी विमलबाई विठ्ठलराव भोयटे, भाऊसाहेब बाबा बरकडे व त्यांच्या सुविद्य पत्नी भागुबाई भाऊसाहेब बरकडे, सुभाष प्रभाकर गोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी शारदा सुभाष गोरे आणि भाऊसाहेब पर्वती खेतमाळीस व त्यांच्या सुविद्य पत्नी कल्पना भाऊसाहेब खेतमाळीस या उभयतांच्या शुभहस्ते वजन काटा व गव्हाणीची विधीवत पुजा करण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी 10 वाजता मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, तालुक्याचे माजी आमदार राहुलदादा जगताप, साखर संघाचे संचालक घनशाम शेलार, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव घनवट, श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे, पं.स. सभापती गितांजली पाडळे, लेबर फेडरेशनचे संचालक अनिल पाचपुते यांच्यासह तालुका पातळीवरील विविध संस्थांचे पदाधिकारी व राजकिय पक्षांचे तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, दुध संघाचे चेअरमन सोपानराव थिटे व आजी माजी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
तरी या गाळप हंगाम शुभारंभास सभासद, ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कोरोना नियमाचे पालन करून उपस्थित रहावे, असे आवाहन व्हा. चेअरमन युवराज चितळकर व संचालक मंडळाने केले आहे.
Comments