जिल्हाधिकार्यांचा ग्रामीण लॉकडाऊन पॅटर्न यशस्वीतेकडे
अहमदनगर । वीरभूमी- 18-Oct, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ज्या गावात दहा पेक्षा जास्त कोरोना बाधित आहेत अशा गावात ग्रामीण लॉकडाऊन केला होता. याचा परिणाम हळु हळु दिसू लागला आहे. आज सोमवारी जिल्ह्यात फक्त 163 कोरोना बाधित आढळले. यामुळे नगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.
काही दिवसापुर्वी संगमनेर, पारनेच्या आकडेवारीमुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आज पारनेर 13 तर संगमनेर 12 असे रुग्ण आढळल्याने समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे नऊ ठिकाणही आकडेवारी दहा पेक्षा कमी असून सर्वाधिक असलेल्या राहुरीची आकडेवारी 21 वर आहे.
आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 21, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 105 तर अँटीजेन चाचणीत 37 असे 163 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहुरी 21, राहाता 19, नगर ग्रामीण 17, कोपरगाव 14, नगर शहर 13, पारनेर 13, संगमनेर 12, इतर जिल्हा 9, पाथर्डी 9, श्रीगोंदा 8, नेवासा 7, शेवगाव 6, अकोले 5, जामखेड 4, कर्जत 3, श्रीरामपूर 3 असे कोरोना बाधित आढळून आले.
याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांने नियमांचे पालन करत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतल्यास लवकरच नगर जिल्हा कोरोनामुक्त झालेला पहायला मिळेल. यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
Comments