अहमदनगर । वीरभूमी- 21-Oct, 2021, 12:00 AM
मागील आठवड्यापासून नगर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणार्या जिल्ह्याच्या यादीत अहमदनगरचा समावेश होत होता. मात्र नागरिकांचा संयम व प्रशासनाचे नियोजन यामुळे मागील आठवड्यापासून नगर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा कोरोनामुक्तीकडे जात आहे. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण फक्त 201 कोरोना बाधित आढळले आहेत. आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वात जास्त संगमनेरची आकडेवारी असून ती 34 एवढी आहे. तर नगर शहरासह आठ ठिकाणची आकडेवारी 8 पेक्षा कमी आहे.
काल बुधवार पर्यंत जिल्ह्यात तब्बल 3 लाख 52 हजार 752 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी तब्बल 3 लाख 43 हजार 887 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार सुरू असतांना जब्बल 6 हजार 985 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे. तर सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 880 एवढी झाली आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 102, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 65 तर अँटीजेन चाचणीत 34 असे 201 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 34, श्रीगोंदा 29, राहाता 28, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 18, पारनेर 17, अकोले 12, कर्जत 10, नगर शहर 8, शेवगाव 7, पाथर्डी 5, राहुरी 5, श्रीरामपूर 5, नेवासा 2, जामखेड 1 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र बाधितांचा आकडा कमी होत असला तरी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये नियमित मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments