नगरसेवक सागर फडके यांचे सामाजिक कार्य मोलाचे
सिने अभिनेत्री हेमांगी कवी यांचे प्रतिपादन । या स्पर्धकांना मिळाली बक्षिसे
शेवगाव । वीरभूमी- 22-Oct, 2021, 12:00 AM
‘सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं’ हे ब्रीदवाक्य घेऊन साम्राज्य ग्रुपच्या माध्यमातून नगरसेवक सागर फडके यांच्या टिमने खर्या अर्थाने सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे. याचा प्रत्यय आज मला आला असे प्रतिपादन मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री हेमांगी कवी यांनी केले.जगदंबा महिला मंडळ व साम्राज्य ग्रुप शेवगावच्या वतीने कोजागरी पोर्णिमेनिमित्त लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात आयोजित ‘महिला महोत्सव - जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमानिमित्त आयोजित नृत्य स्पर्धेच्या बक्षिस वितरण, समारोप व लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी आ. मोनिकाताई राजळे, माजी ग्रामपंचायत सदस्या सुनिताताई फडके, जगदंबा महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाताताई फडके, रुपालीताई फडके, नगरसेवक सागर फडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी हेमांगी कवी पुढे म्हणाल्या, महिला महोत्सवामध्ये आज खर्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर झाला, याचे खरे समाधान आहे. महिला महोत्सवानिमित्त महिलांसाठी स्वतंत्रपणे मोफत कोरोना लसीकरण मोहीम, मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, मायलेकीसाठी स्वतंत्र नृत्य स्पर्धा, वैयक्तिक नृत्य स्पर्धा व दिवाळीच्या तोंडावर सोन्याची नथ, सेमी पैठणी व पैठणी साडी जिंकण्याची संधी देणारा लकी ड्रॉ अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेवगाव सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार्या जगदंबा महिला मंडळ व साम्राज्य ग्रुपची ही कौतुकास्पद कामगिरी आहे.
आ. मोनिकाताई राजळे म्हणाल्या, शेवगाव मधील महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सागर फडके यांनी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. खास महिलांसाठी असलेल्या या व्यासपीठावर महिला व मुलींनी आपली कला सादर करणे ही मोठी सन्मानाची बाब आहे. सागर फडके हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. समाजात चांगले काम करणार्या लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे गरजेचे असते, नेमके हेच काम सागर फडके यांनी केले
नगरसेवक सागर फडके आपल्या प्रास्तविकपर भाषणात म्हणाले, कोरोनाचे सावट दूर होत असतांनाच सरत्या वर्षात आपणा सर्वांशी थेट संवाद साधता यावा. कोजागरी निमित्त मुद्दाम महिला महोत्सव - जागर स्त्री शक्तीचा या कार्यकमांचे आयोजन करण्यात आले. भविष्यात असे अनेक उपक्रम तसेच विकासात्मक काम करण्याच्या योजना आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय त्या पूर्ण होणे अशक्य आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्वांचे पाठबळ गरजेचे आहे.
वैयक्तिक नृत्य स्पर्धेच्या मोठ्या गटात गायत्री नांगरे हिने प्रथम, समृद्धी सारडा व धनश्री नाईक यांना द्वितीय क्रमांक विभागून, अनुजा पुदाले व गौरी धनवडे यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. तर छोट्या गटात संस्कृती पिसाळ व श्रुती अंधारे यांना प्रथम क्रमांक विभागून, सानवी लबडे हिला द्वितीय, प्रिंजल छेडा व समृद्धी हरदास यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.
मायलेकी नृत्य स्पर्धेत प्रतिभा सुपारे - यशांजली सुपारे व पूनम बंब - दर्शना बंब यांना प्रथम क्रमांक विभागून, पूनम फुंदे - इशिता फुंदे व शुभांगी लवांडे - स्नेहल लवांडे यांना द्वितीय क्रमांक विभागून तर रत्ना बैरागी - प्रांजल बैरागी यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. उध्दव काळापहाड यांनी या नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
विजेत्या स्पर्धकांना हेमांगी कवी, आ. मोनिकाताई राजळे, सुनिताताई फडके, सुजाताताई फडके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. महिलांसाठी आयोजित भव्य लकी ड्रॉ मध्ये वैशाली भोकरे, सुनिता मुरदारे व पूनम बंब यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पैठणी, सेमी पैठणी व सोन्याची नथ ही बक्षिसे मिळाली.
कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सेवा देणार्या डॉ. गायत्री परदेशी, डॉ. अंबिका म्हस्के, डॉ. शर्वरी मगरकर, डॉ. मेधा कांबळे, डॉ. मनीषा लड्डा, डॉ. तनुजा वासनिक, डॉ. पूजा नाईक, डॉ. अश्विनी सोनवणे, डॉ.शिल्पा देहाडराय, डॉ. अश्विनी चेके, इनरव्हील क्लब, माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी बहुमंडळ व प्रतिभा चाफेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शेवगाव मधील महिला पोलीस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, परिचारिका, अधिपरिचारिका, सफाई कामगार या महिलांना कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार देण्यात आला.
उद्धव काळापहाड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुजाताताई फडके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री जगदंबा महिला मंडळ व साम्राज्य ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
DnOgPFVR