अहमदनगर । वीरभूमी- 28-Oct, 2021, 02:28 PM
अहमदनगर । वीरभूमी-
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये चढउतार सुरूच असून बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांमध्ये 7 ने वाढ झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण 167 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये श्रीगोंदा तालुका टॉपवर आला असून येथील आकडेवारी 33 वर आली आहे. श्रीगोंद्याबरोबरच इतर ठिकाणच्या आकडेवारीतही काहीशी वाढ झाली आहे. मात्र आज जामखेड तालुक्यांची आकडेवारी शुन्यावर आली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर : //veerbhuminews.com/VeerBhumi/news/1588/akole-s.t.-aagar-straik
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 63, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 67 तर अँटीजेन चाचणीत 37 असे 167 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- श्रीगोंदा 33, नगर शहर 17, पारनेर 12, राहाता 11, राहुरी 11, कर्जत 10, नेवासा 10, संगमनेर 10, कोपरगाव 9, शेवगाव 9, श्रीरामपूर 9, नगर ग्रामीण 8, अकोले 6, इतर जिल्हा 5, पाथर्डी 4, भिंगार 2, मिलटरी हॉस्पिटल 1 असे कोरोना बाधित आढळून आले.
बेपत्ता सत्यमचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला : //veerbhuminews.com/VeerBhumi/news/1587/newasa-balaji-dedgaon-crime
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत चढउतार कायम आहे. यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
nGgqeLfXYmb