अहमदनगर । वीरभूमी- 03-Nov, 2021, 03:00 PM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मोठी घट झाली असून नगरकरांना मोठा दिलासा मिळत आहे. आज बुधवारी जिल्ह्यात एकुण 96 कोरोना बाधित आढळले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये चढउतार सुरूच असून आज मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी बाधितांच्या आकडेवारीत वाढ झाली होती. मात्र आज आकडेवारीत मोठी घट झाली आहे.
विशेष म्हणजे नेहमी टॉपवर असलेल्या संगमनेरचा आकडा आज प्रथमच शुन्यावर आला आहे. तर पाथर्डी, मिलटरी हॉस्पिटल येथील आकडेवारीही शुन्यावर आली आहे. तसेच श्रीगोंदा, पारनेरची आकडेवारीही अनुक्रमे 5 व 6 अशी आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वात जास्त आकडेवारी नगर शहराची असून ती 15 इतकी आहे. त्याखालोखाल नेवासा, अकोले, राहाता अशी क्रमवारी लागत आहे. तर इतर ठिकाणची आकडेवारी 7 पेक्षा कमी आहे.
आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 21, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 48 तर अँटीजेन चाचणीत 27 असे 96 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 15, नेवासा 13, अकोले 11, राहाता 11, नगर ग्रामीण 7, पारनेर 6, जामखेड 5, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 5, कर्जत 4, इतर जिल्हा 4, शेवगाव 4, भिंगार 2, कोपरगाव 2, राहुरी 2 असे कोरोना बाधित आढळून आले. तर पाथर्डी, संगमनेर, मिलटरी हॉस्पिटल येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आटोक्यात असला तरी नारिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
PoDBucevKq