पाथर्डी तालुक्यातील घटना । एक जण जखमी
करंजी । वीरभूमी- 06-Nov, 2021, 02:55 PM
पाथर्डी तालुक्यातील करंजी गावालगत असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री 12.15 वाजेच्या सुमारास भावले वस्तीवर दरोडा पडला.
या दरोड्यात दरोडेखोरांच्या मारहाणीत गोपीनाथ लक्ष्मण भावले (वय 80) यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले (वय 76) या देखील या घटनेत गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री 12.15 वाजेच्या दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी करंजी येथील भावले यांच्या घरावर हल्ला करत मारहाण केली. यावेळी दुसर्या खोलीत झोपलेला भावले यांचा नातु जागा झाला. त्यालाही दगड मारून दरोडेखोरांनी घरात जाण्यास भाग पाडले.
तर इतर शेजारी भावले यांच्या मदतीला येउ नयेत म्हणुन त्याच्या घरावरही दरोडेखोरांनी दगड भिरकावले. दरोडेखोरांनी वयोवृद्ध भावले कुटूंबास मारहाण केल्याने त्यांच्या नातवाने जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर फोन करून माहीती दिली. पंपावरील कामगार आल्याचे कळताच दरोडेखोर पसार झाले.
भावले यांना मारहाण झाल्याने खोलीत सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. पंपावरील कामगारांनी जखमी भावले यांना नगरला दवाखान्यात नेण्यास मदत केली. या घटनेची माहिती पोलिसांना सजमजताच पोलीस तात्काळ हजर झाले.
पहाटे चार श्वान पथक येउन त्या श्वानाने महामार्गा पर्यंत दिशा दाखवली. सकाळी पुन्हा ठसे तज्ञाना बोलावण्यात आले. त्यांनीही ठसे व इतर माहीती तपासासाठी लागणारी माहीती गोळा केली.
या दरोड्याची माहीती समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी येऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दुपारपर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम चालु होते.
UdyCbcNPjTez