अहमदनगर विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर
अहमदनगर । वीरभूमी- 09-Nov, 2021, 03:32 PM
राज्यातील सात विधान परिषदेसह अहमदनगर विधान परिषदेचे आमदार अरुणकाका जगताप यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपुष्टात येत आहे. यामुळे रिक्त होणार्या जागेसाठी राज्यातील सात विधान परिषद मतदार संघात निवडणूक जाहीर करण्यात आली होती.
मात्र स्थानिक प्राधिकरणामध्ये कार्यरत असलेल्या मतदारांपैकी 75 टक्केपेक्षा कमी मतदार असल्याने अहमदनगर व सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक होणार नाही. मात्र इतर पाच ठिकाणच्या विधान परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधान परिषद निवडणूक लांबणीवर गेल्याने इच्छुकांना चांगली तयारी करण्यास मोठा वेळ मिळणार आहे.
राज्यातील मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदूरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम, नागपूर, सोलापूर व अहमदनगर अशा सात विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपत आहे. या रिक्त होणार्या जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यकाळ जाहीर केला आहे. मात्र यामधून सोलापूर व अहमदनगर विधान परिषद मतदार संघाला वगळले आहे.
याबाबत निवडणूक आयोगाने मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदूरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम, नागपूर या मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
यानुसार 16 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे. 24 नोव्हेंबर रोजी दाखल अर्जाची छाननी, 26 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे तर दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर दि. 14 डिसेंबर रोजी मतदान मोजणी होणार आहे.
सात पैकी इतर पाच विधान परिषदेसाठी निवडणूक होत असून सोलापूर व अहमदनगर विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना मतदारांना संपर्क करण्यास मुबलक वेळ मिळणार आहे.
ctarQZbeCwHhOfJ