कोपरगाव शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला निधी कमी पडू देणार नाही
आ. आशुतोष काळे । कोपरगाव शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ
कोपरगाव । वीरभूमी - 21-Nov, 2021, 08:05 AM
कोपरगाव शहराच्या विकासासाठी 12 कोटीचा निधी दिला असून त्या निधीच्या माध्यामातून कोपरगाव शहरातील महत्वाच्या रस्त्यांसह प्रत्येक प्रभागाची विकासकामे होणार आहेत. भविष्यात देखील कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत येणार्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये प्रभाग क्रमांक 8 मधील गोकुळ नगरीच्या ख्रिश्चन स्मशानभूमीची संरक्षक भीत बांधणे व सोयी सुविधा निर्माण करणे,खडकी परिसरातील मदरसा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक 1 मधील खडकी येथील खरे घराजवळील नाल्यावरील सीडी वर्क व खैरणार घराजवळील सीडी वर्क करणे, प्रभाग क्रमांक 6 मधील भाऊ बोरा घर ते मनोज अग्रवाल घर रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण करणे व कोपरगाव नगरपरिषद अंतगर्त विविध विकासकामांचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव शहरातील विविध विकास कामांना चालना देण्यासाठी आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत अनेक आंदोलने करून शहरविकासाला चालना दिली आहे. कोपरगाव शहरातील जनतेला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी 5 नं. साठवण तलावाचे प्राथमिक खोदाई काम पूर्ण करून पुढील कामासाठी निधी मिळावा यासाठी माझे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पुढील कामासाठी निधी मिळवून हे काम लवकरच पूर्ण होऊन अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त राहावे.
मात्र त्याच बरोबर शहरातील इतरही विकासाचे अनेक प्रश्न देखील अत्यंत महत्वाचे आहेत. यामध्ये प्रत्येक प्रभागातील रस्ते, भूमिगत गटारी, शहर सुशोभिकरण तसेच सर्व प्रमुख रस्ते यांचा देखील विकास करणे गरजेचे आहे. हि सर्व कामे देखील मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी कोपरगाव शहराला कसा मिळविता येईल यासाठी माझे राजकीय वजन वापरून शहर विकासाचे सर्व प्रश्न सोडविणार आहे.
ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत विश्वास दाखविला तोच विश्वास शहर विकासाला गती देण्यासाठी येणार्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत दाखवा. येणार्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या कोपरगाव शहरातील सर्व विकासाचे प्रश्न सोडवून दाखवील अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, महिला शहराध्यक्षा नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाळ, रमेश गवळी, फकीर कुरेशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, सुधीर डागा, प्रकाश बंब, दिलीप गवांदे, सुनील बोरा, अॅड.विजय गवांदे, राजेंद्र फुलपगर, सचिन मुंदडा, आर. टी. पटेल, आकाश डागा, अमोल बोगा, रोशन डागा, यश लोहाडे, जय बोरा, संकेत ठोळे, मुकुंद भुतडा, प्रकाश दुशिंग, विजय नागरे,
दिनेश संत, अजहर शेख, डॉ. भोसले, गोखले ताई, रंजनाताई पटेल, भावनाताई गवांदे, सीमाताई कंगले, भाग्यश्री बोरुडे, राजेंद्र जोशी, बाला गंगुले, धनंजय कहार, प्रशांत वाबळे, दिनेश संत, ऋषिकेश खैरनार, नारायण लांडगे, शारदा दुशिंग, मौलाना रियाज खान, मौलाना आसिफ साहेब, मौलाना बशीर हाफिज, मौलाना शपिक, मौलाना अनिस, शकील पटेल, अल्ताफ पटेल, इरफान तांबोळी, जावेद शेख, फिरोज पठाण, जुनेद शेख, इम्तियाज अत्तार, साजिद शेख, फादर विशाल त्रिभुवन, फादर भोसले, दिनेश पवार, किशोर डोखे, किरण बागुल,
विजय शिंदे, सौ. मायादेवी खरे, सौ. मनीषा डोखे, सौ. संगीता पवार, ताई साळवे, सौ. मीनाक्षी शिंदे, सौ. चंद्रभागा हिंगे, सौ. ज्योती बागुल, राणीताई पवार, राजेंद्र खैरनार, चांदभाई पठाण, आप्पा आरख, बाबुराव पवार, नितीन शेलार, मधुकर पवार, अक्षय पवार, सोमेश आढाव, मिलिंद सरोवर, किरण बागुल, बाळासाहेब दहे, निलेश रुईकर, रमेश कुहीरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
UbmoOjGchPqnTE