लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत 13 टक्क्यांने वाढ
राजेश गायकवाड । वीरभूमी- 26-Nov, 2021, 02:09 PM
संगमनेर ः लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत 2021 मध्ये करण्यात आलेल्या कारवायामध्ये गेल्या वर्षापेक्षा यावर्षी ऑक्टोबर पर्यत 13 टक्के कारवाई झाल्याचे दिसून आले आहे. तसेचं गेल्या वर्षाच्या तुलनेत 119 च्या कारवाया वाढल्याचे दिसून आले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेबरपर्यत 518 सापळ्यातून 710 आरोपी सापडले होते. यावर्षी 637 सापळ्यातून 896 आरोपी सापडले आहे. राज्य शासनाच्यावतीने लाचलूचपत प्रतिबंध विभाग हे शासकिय सेवक, आधिकारी यांच्यावर कटाक्षाने नजर ठेवून असते.
यातुन 1068 या क्रमांकावर आलेल्या तक्रारी व फोन वरून मिळालेल्या याहीती वरुन तातडीने उपाययोजना करण्यास तप्तर असतात. तसेच केलेल्या कारवाईची दैनदिन माहीती लाचलुचपत विभागाच्या संकेतस्थळावर अदयावत केली जाते आहे.
राज्यात 1 जानेवारी पासून ते ऑक्टोबर पर्यंत एकूण 645 गुन्हात 918 आरोपी सापडले असून यामध्ये सर्वाधीक सापळे व सार्वधिंक भ्रष्ट आरोपी हे पुणे परिक्षेत्रात आढळून आले. पुणे परिक्षेत्रात 139 सापळ्यात 201 आरोपी सापडले तर त्या खालोखाल औरंगाबाद परिक्षेत्रामध्ये 116 सापळ्यामध्ये 163 आरोपी मिळून आले. तर सर्वात कमी 44 सापळ्यात मुंबईच्या परिक्षेत्रात 61 आरोपीना अटक करण्यात आले तर गेल्या वर्षी कडक लॉकडॉऊन असतानाही भ्रष्टाचार व त्या अनुषंगाने सापळे कमी झाले नव्हते.
त्यातचं आता लॉकडॉऊनचे नियमांत शिथिलता झाली असून शासकिय कामे नियमित सुरु झाले आहे. मात्र लॉक डॉऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घडी विस्कटल्यामुळे लाचखोरीचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळ्यामध्ये गती निर्माण केल्याचे दिसून येत आहे तर लाचखोरीत पोलिस व महसूल विभागातील लोक प्रामुख्याने दिसत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉकडॉऊनमुळे विस्कटलेल्या आर्थिक घडीमुळे नियमांत शिथिलता होताचं लाचखोरीचे प्रमाण वाढल्यानेचं राज्यात यावर्षी जानेवारी ते आक्टोबर पर्यत सापळ्याची संख्या 637 इतकी झाली यात लाच स्विकारताना 896 जण पकडली गेली. तर 645 गुन्हे दाखल झाले असून 918 आरोपीना अटक करण्यात आले आहे.
नगरसह नाशिक जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत महसूल व पोलिस विभाग आघाडीवर आहे. सरकार कुठलेही असले तरी अधिकारी कर्मचारी सरासपणे पैशाची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार असे दोन्ही बाबू लाच घेण्यात आघाडीवर आहे. तर अनेक जण बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाही.
पुरूषांप्रमाणे महीलाही लाच घेताना पुढे असुन सरकारी कामात लाच घेतल्या शिवाय काम होत नसल्याचे दिसून आले आहे. सातत्याने लाचेच्या मागणीत वाढ होत आहे. तर अनेकदा तडजोडीने प्रश्न सोडविले जातात. कोरोना सारख्या महामारीत देखील लाचेची मागणीत वाढ झाल्याने ही बाब चिंताजनक आहे.
Comments