श्रीगोंदा । वीरभूमी- 26-Nov, 2021, 07:53 PM
‘नागवडे’ सहकारी साखर कारखान्याने एका दिवसात विक्रमी 6 हजार 380 मेट्रीक टन ऊसाचे गाळप करुन गाळपात नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याची माहीती कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना यावर्षीचे 8 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट निश्चितपणे पूर्ण करील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे यांनी उभा केलेला दक्षिणेतील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या ‘नागवडे’ कारखान्याचा कारभार अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर आहे.
अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे व संचालक मंडळ स्व. बापूंच्या शिकवणुकीनुसार सभासद हिताचा, काटकसरीचा, पारदर्शी कारभार करीत असून आम सभासदांच्या व ऊस उत्पादक शेतकर्यांचा कारखान्याचा कारभारावर विश्वास आहे. संचालक मंडळही विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी सचोटीने कारभार करीत असल्याचे सांगीतले.
ते म्हणाले की, 4 हजार 800 मेट्रीक टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या ‘नागवडे’ कारखान्याने या हंगामातील एका दिवसातील विक्रमी गाळप करीत दि. 25 रोजी 6 हजार 380 मेट्रीक टन ऊसाचे गाळप करुन गाळपाचा नवा विक्रम स्थापित केला आहे. आजअखेर अगदी कमी कालावधीत 30 दिवसातच 1 लाख 52 हजार 70 मे. टन ऊसाचे गाळप केले असून 2 लाख 82 हजार 570 साखर गोणी उत्पादीत केली आहे.कारखान्याचा आजअखेरचा सरासरी साखर उतारा 9.50 आहे.
‘नागवडे’ कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत झालेला असून या प्रकल्पातून कारखान्याने आजअखेर 30 लाख 67 हजार 700 किलो वॅट युनिट वीज निर्माण केली असून कारखान्याला लागणारी वीज सोडून 17 लाख 47 हजार 800 किलो वॅट युनिट प्रतितास वीज महावितरण कंपनीला निर्यात केली असल्याचे सांगितले.
चितळकर म्हणाले की, अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे व संचालक मंडळ सभासद हितासाठी कटीबध्द राहूनच कारभार करीत आहे. कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प व आसवनी प्रकल्पही लवकरच कार्यान्वीत करुन उत्पादन सुरु करणार असल्याची माहिती चितळकर यांनी दिली.
दरम्यान गाळपाचा नवा विक्रम केल्याबद्दल कारखान्याचे खातेप्रमुख व कर्मचार्यांचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, उपाध्यक्ष युवराज चितळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, कामगार युनियनचे अध्यक्ष बापूराव नागवडे व संचालक मंडळाने अभिनंदन केले.
Comments