अकोले । वीरभूमी - 27-Nov, 2021, 09:22 AM
अकोले नगरपंचायत साठी भाजपला रोखण्यासाठी अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना महाविकास आघाडी सोबत राहणार असून नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावयाचा आहे, असे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केले.
दि. 24 नोव्हेंबर रोजी अकोले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 चा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला. सर्व प्रक्रिया पार पडण्यासाठीचा कालावधी अत्यल्प असल्याने व अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आज नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची व निवडणूक नियोजनासाठी मीटिंग शिवसेना पक्ष कार्यालयात घेण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री. धुमाळ बोलत होते.
यावेळी महेशराव नवले, नितीन नाईकवाडी, प्रदीप हासे, प्रमोद मंडलिक, सौ. अनिता मोरे, डॉ. मनोज मोरे, सौ. मंगलाताई शेलार, सौ. सारिका मैड, गणेश कानवडे, महेश हासे, नवनाथ शेटे, मुश्ताक शेख, स्वप्नील कर्णिक, बल्लेश्वर चौधरी, श्रीकांत मैड, शरद भांगरे, गुरुनाथ नाईकवाडी, मिलिंद रूपवते, भानुदास धुमाळ, धुमाळ ताई, भानुदास पानसरे आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री. धुमाळ म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेवर असून राज्यात भाजपाला रोखण्यात त्यांना यश आले आहे. त्याच धर्तीवर अकोले नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
महाविकास आघाडी बरोबर शिवसेना राहणार असून सर्व संमतीने उमेदवार ठरविले जातील. त्यावेळी सर्वानी आपल्या उमेदवारां बरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन श्री. धुमाळ यांनी केले.
या निवडणुकीसाठी ज्येष्ठ मंडळींची एक समिती तयार करून त्यांच्या मार्फत कोणत्याही प्रभागात निवडणुकी संदर्भात अडचण असल्यास ते सोडवून घ्यावी. ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना सर्वानी निवडून आणावे.
अकोले नगरपंचायत निवडणूक अतिशय महत्वाची आहे. याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी अशा सूचना केल्या. यावेळी महेश नवले, नितीन नाईकवाडी, सौ. अनिता मोरे, प्रदीप हासे यांनी मार्गदर्शन केले.
oCQAKwrbydv