राज्यात पुन्हा निर्बंध । काय आहेत नियम वाचा
मुंबई । वीरभूमी- 27-Nov, 2021, 11:18 PM
कोरोना संसर्गाची लाट ओसरल्यानंतर देशासह राज्यात जनजीवन पुर्वपदावर येत नाही तोच आफ्रिका व युरोपमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन राज्य सरकारनेही पुन्हा निर्बंध घातले आहे.
कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर जीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच दक्षिण आफ्रिका व युरोपमध्ये ओमिक्रोन व्हेरिएंटची दोन रुग्ण आढळले आहेत. यामुळे जगभरात लॉकडाऊनची भिती व्यक्त केली जात आहे.
यामुळे राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणुन काही निर्बंध घातले आहेत. यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच रेल्वे प्रमाणे बस, रिक्षा प्रवासास मुभा असणार आहे. टॅक्सी, रिक्षा अशा सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार्यांना मास्क वापरने बंधकारक करण्यात आले आहे. विना मास्क तसेच नियम मोडणार्यांना 500 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.
तसेच दुकानात विनामास्क ग्राहक आढळल्यास ग्राहकाला 500 रुपये दंड तर दुकानदाराला 10 हजार रुपयाचा तर मॉल मालकाला 50 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
राजकीय सभा व कार्यक्रमांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास 50 हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.
मात्र ओमिक्रोन व्हेरिएंटचा एकही रुग्ण देशात नाही. यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये. मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले नसेल त्यांनी लसीकरण करून घ्यावे, नियमित मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
IvtXRMUajeY