श्रीगोंदा । वीरभूमी - 28-Nov, 2021, 08:09 PM
श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलीकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे १,११,१११ व्या साखर पोत्याचे पुजन रविवार दि.२८ रोजी संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले.
कर्मयोगी जगताप कुकडी साखर कारखान्याने दि.२७ अखेर १,२५,८५० मे.टन ऊसाचे गाळप करून १,०८,३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याने शनिवार अखेर ५६,५८,२४० युनिट वीज निर्मिती करुन महावितरणला वितरण केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष मा. आमदार राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या गळीत हंगामात नऊ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे संचालक मंडळाने नियोजन केले आहे.
कुकडीचे उपाध्यक्षा ललीता बाळासाहेब उगले, विश्वासराव थोरात, विवेक पवार, ॲड. सुभाष डांगे, एकनाथराव बारगुजे, मनोहर वीर , सुखदेव तिखोले, सुभाष वाघमारे, धनंजय शिंदे, बाळासाहेब भोंडवे, अंकुश रोडे, निवृत्ती वाखारे, प्रल्हाद इथापे, मोहन कुदांडे, उत्तम शिंदे, विनायक लगड यांच्या हस्ते १,११,१११ व्या साखर पोत्याचे पुजन झाले.
या वेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप म्हणाले की स्व.कुंडलीकराव तात्या जगताप यांच्या शिकवणूकीनूसार सभासद हिताचा, काटकसरीचा, पारदर्शी कारभार करीत असून आम सभासदांच्या व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्याचा कारभारावर विश्वास आहे. संचालक मंडळही ही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही यासाठी सचोटीने कारभार करीत असल्याचे सांगून कारखान्याचे या वर्षीचे गाळप स्व.कुंडलीकराव तात्या जगताप यांचे आशिर्वादाने सुरळीत चालु झाले आहे.
तसेच लवकरच कारखाना प्रतिदिन ६,५०० मे.टन गाळपाचे उददीष्ट गाठेल त्यामुळे जास्तीत जास्त ऊस गाळप कारखाना करणार आहे. याप्रसंगी साखर संघ व कामगार संघटना यांच्यात झालेल्या करारानुसार कारखान्यातील कर्मचा-यांना १२ टक्के पगारवाढ देण्याचे त्यानी जाहीर केले.
यावेळी आमदार राहुल जगताप, प्रभारी कार्यकारी संचालक भास्कर काकडे, सुभाष कुताळ, रामदास शेटे, नारायण सरोदे ,अनिल भगत, दत्तात्रय तावरे, गोपीनाथ पवार, सचीन झणझणे, अनिल कराळे, कल्याणराव जगताप, विष्णुपंत जठार, दादासाहेब औटी, जगन्नाथ औटी, गंगाराम मचे, भाऊसाहेब डांगे, अनिल म्हस्के, स्वप्नील लाटे, नितीन डुबल, सभासद शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
Comments